Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे ५ दिवस! लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Majhi Ladki Bahin Yojana August Month Installmet Date: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी येणार?

ऑगस्ट महिना संपायला अवघे ५ दिवस उरले आहेत

लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे. ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अद्याप योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

लाडकीचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana August Month Installment Date)

लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, कदाचित गणेशोत्सवाच्या कालावधीत लाडकीच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. हा हप्ता कदाचित लांबणीवरदेखील जाऊ शकतो. गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. त्यामुळे या महिन्यात गणेशोत्सवात किंवा पुढच्या महिन्यात पैसे येणार आहेत.

ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana August-September Installment May Come Together)

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. जर हप्ता लांबणीवर गेला तर पुढच्या महिन्यात पैसे जमा होणार आहेत. जर हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाणार असेल तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्नदेखील विचारला जात आहे. जर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र दिले तर महिलांना ३००० रुपये मिळणार आहे.

अपात्र लाडक्या बहि‍णींवर कारवाई होणार (Action To Be Taken Ineligible Women)

लाडकी बहीण योजनेतून २६ लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या आहेत. आता या महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. त्यातून ज्या महिला अपात्र ठरणार आहेत त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. त्यांच्या कारवाईदेखील केली जाणार असल्याचे सांगितले आहे. या महिलांची जिल्ह्यानुसार पडताळणी होणार आहे.अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची पडताळणी करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT