Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न किती असावे? अट काय? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana Eligibility: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या महिलांचे आणि कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. आता या योजनेची रक्कम वाढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहे. या अटींमध्ये पात्र असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेची मुख्य अट म्हणजे महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. त्यामुळे ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. (Ladki Bahin Yojana Eligibility)

महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात म्हणजे त्यांचे वार्षिक उत्पन्न ५ ते ७ लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.तसेच ज्या महिला सरकारी विभागात काम करतात किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी विभागात काम करतात. त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. (Ladki Bahin Yojana Conditions)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लवकरच महिलांना दर महिन्याला २१०० रुपये मिळणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाऊ शकतात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरु झाली आहे. या पडताळणीत ज्या महिलांचे अर्ज खरे असतील त्यांना पुढचे पैसे मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उमरगा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आक्रमक

Breaking: सी-फूड एक्सपोर्ट कंपनीमध्ये मोठी दुर्घटना, गॅसची गळती होऊन ७ महिला कामगारांचा मृत्यू

वर्षभरापासून फरार असलेले घायवळ टोळीचे २ शार्पशूटर जेरबंद; गुन्हेगारी वर्तुळात खळबळ

Crime News: म्हाडा कॉलनीत दोन गटात हाणामारी; मारामारीदरम्यान एकानं जमावावर ताणली बंदूक अन्...

किसान क्रेडिट कार्डच्या नियमात बदल; RBI ची घोषणा

SCROLL FOR NEXT