Ladki Bahin Yojana  google
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जून महिन्याचा ₹1500 चा हप्ता नेमका कधी येणार? तारीख समोर

Ladki Bahin June Installment Update : लाडकी बहीण योजनेचा जून २०२६ चा हप्ता अजून जमा झालेला नाही. ई-केवायसी आणि अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १२ ते १५ जुलैदरम्यान १५०० रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातल्या महिलांची अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना आहे.जून महिन्यात लाडक्या बहि‍णींना मेचा हप्ता आला होता.पण जून महिना संपायला फक्त दिवस शिल्लक असून सुद्धा जून महिन्याचा हप्ता लाडकीच्या खात्यात आलेला नाही. त्यामुळे खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? असा प्रश्न राज्यभरातल्या लाडक्या बहि‍णींना पडला आहे. पण या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे.

जूनचा हप्ता कधी जमा होणार? Ladki Bahin Yojana June 2026 installment date

जून महिन्याचा हप्ता अजुनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना, सामाजिक माध्यमांवरही महिलांकडून सातत्याने हप्त्याबद्दल विचारपूस केली जातेय. अशातच मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा पुढच्या महिन्यात म्हणजेच १२ ते १५ जुलै दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या महिलांना मिळणार नाही लाडकीचा हप्ता

राज्य सरकारकडून लाभार्थींच्या अर्जांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर राबवली. या प्रक्रियेत अपात्र आणि निकषांमध्ये न बसणारे अनेक अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी वितरणाची प्रक्रिया जास्त वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लाडकी बहीण योजनेमध्ये याआधी काही महिन्यांचे हप्ते एकत्र सुद्धा लाडकीच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यामुळे यंदाही निधी वितरणात काही दिवसांचा उशीर झाल्याने महिलांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे प्रशासनातल्या सूत्रांकडून सांगितलं जात आहे. निधी थेट लाभार्थींच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे जमा केला जाणार आहे. पण या संदर्भात अजुन कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुत्र्याच्या हल्ल्यात 150 जण जखमी ; कुत्र्याच्या शोधासाठी पोलीस मैदानात

काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातील माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश?

Ram Temple: राममंदिर चोरीविरोधात साधू-संत रस्त्यावर; पंतप्रधान निवासस्थानाकडे साधू करणार आंदोलन

खड्डयांमुळे 20 कंपन्या चाकण सोडणार? खड्डे आणि वाहतूक कोंडीने उत्पादनावर परीणाम, 4 हजार कामगारांच्या रोजगारावर संकट

अमित शाह पवारांच्या घरी; रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्याला लावली उपस्थिती, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT