Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीला रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट मिळणार, खात्यात ₹१५०० जमा होणार

Ladki Bahin Yojana July Month Installment: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींचा जुलैचा हप्ता लांबणीवर जाणार

ऑगस्ट महिन्यात लाडकीच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार

रक्षाबंधनच्या दिवशी सणासुदीला हे पैसे जमा होण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता कधीपर्यंत येणार याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता कदाचित लांबणीवर जाऊ शकतो. ऑगस्ट महिन्यात लाडकीच्या खात्यात १५०० रुपये जमा होऊ शकतात. दरम्यान, अजून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच ही माहिती दिली जाईल.

या दिवशी खात्यात पैसे जमा होणार

जुलै महिना संपायला अवघे ५ दिवस उरले आहेत. त्यामुळे पैसे कधी जमा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, जुलै महिन्याअखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पैसे जमा होऊ शकतात. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हे पैसे जमा केले जातील. ऑगस्ट महिन्यात ९ तारखेला रक्षाबंधन आहे. त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी कदाचित महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.

रक्षाबंधनच्या दिवशी खात्यात येणार १५०० रुपये (July Installment Recieve on Rakshabandhan)

रक्षाबंधन हे ९ ऑगस्ट रोजी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सणासुदीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे यावर्षी महिलांचे रक्षाबंधन अजून चांगले होणार आहे. दरम्यान, अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या महिलांना मिळणार नाही जुलैचा हप्ता (These Women Will not get july month installment)

लाडकी बहीण योजनेत काही महिलांच्या जुलैचा हप्ता जमा होणार नाही.दरम्यान, ज्या महिला निकषांबाहेर आहेत तरीही त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना योजनेतून बाद केले जाणार आहे. यामध्ये ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. ज्या महिलांकडे चारचाकी वाहने आहेत. ज्या महिला कर भरतात. सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. यासाठी पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना कधी सुरु झाली?

लाडकी बहीण योजना सुरु होऊन १ वर्ष पूर्ण झाले आहे. लाडकी बहीण योजना २९ जून रोजी सुरु झाली होती.

लाडकीला जुलैचा हप्ता कधी मिळणार?

लाडकीच्या खात्यात रक्षाबंधनच्या दिवशी पैसे जमा होण्याची शक्यता आहे. ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे.

कोणाला मिळणार नाही लाडकीचा हप्ता?

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन अर्ज केलेत. त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्यांच्या खात्यात १५०० जमा होणार नाही.

लाडकी बहीण योजनेतून किती महिला अपात्र झाल्यात?

लाडकी बहीण योजनेतून जवळपास १० लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना पैसे मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT