Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: खुशखबर! १० दिवसात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा होणार ₹१५००, जानेवारीच्या हप्त्याबाबत अपडेट

Ladki Bahin Yojana January Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यात जानेवारीचा हप्ता मिळू शकतो.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?

पुढच्या महिन्यात येऊ शकतात ₹१५००

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहे. जानेवारी महिना जवळपास संपत आला आहे. महिना संपत आला असला तरीही महिलांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही. डिसेंबरचा हप्ता जानेवारी महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता जानेवारीचा हप्तादेखील पुढे जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात महिलांना जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

झेडपी निवडणुकीआधी मिळणार जानेवारीचा हप्ता (Ladki Bahin Yojana January Installment Come Before ZP Election)

राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. याआधीही महापालिका निवडणुकीआधी डिसेंबरचा हप्ता जमा केला होता. त्यामुळे यावेळेसदेखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.

जिल्हा परिषदेची निवडणुक ५ फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर निकाल ७ तारखेला लागणार आहेत. त्याआधीच महिलांना पैसे मिळणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते.

या लाडक्या बहि‍णींचा लाभ झालाय बंद

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. महिलांनी केवायसीमध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली असल्याने त्यांचा लाभ बंद केला आहे. प्रश्न न कळल्यामुळे महिलांनी त्याची उत्तरे चुकीची दिल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच आता त्यावर मार्ग काढला आहे. महिलांची आता प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका महिलांची पडताळणी करणार आहे. त्यानंतर महिलांना त्यांची चूक सुधारण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: भय इथले संपत नाही! लोखंडी रॉड, काठ्या आणि चाकूने तरुणावर बीडमध्ये भरदिवसा अमानुष हल्ला, धक्कादायक कारण समोर

Perfect Life partner Tips: लग्नासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर कसा शोधावा? ५ टिप्स लक्षात ठेवाच

Maharashtra Live News Update: डीपीडीच्या निधीवरून खासदार धैर्यशील मोहिते यांनी पालकमंत्र्यांना सुनावले

गर्लफ्रेंडच्या घरात घुसला, इतक्यात शेजारीण आली, बॉयफ्रेंड ४५ मिनिटं लोखंडी पेटीत लपला; पण संशय आला अन्...

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील MIDC मध्ये अग्नितांडव, केमीकल कंपनीत भयंकर आग

SCROLL FOR NEXT