Ladki Bahin Yojana installment Date meta ai
बिझनेस

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

Ladki Bahin Yojana September Instalment Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा ₹१,५०० चा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे मिळून ₹३,००० रुपये मिळणार का? जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana latest news today : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा मिळणारे १५०० रुपये अद्याप खात्यात (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra) जमा झालेले नाहीत. सप्टेंबर महिना संपून ऑक्टोबरची १२ तारीख उजाडली आहे. पण अद्याप हप्त्याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. ऑक्टोबर महिनाही आता अर्धा संपत आल्याने महिलांमध्ये उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण आहे. (Ladki Bahin September instalment date)

सूत्रांच्या माहितीनुसार, सप्टेंबरचा हप्ता दसऱ्यानंतर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, जर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा निधी उशीरा झाला, तर आगामी नोव्हेंबर महिन्यातील दिवाळी सण डोळ्यासमोर ठेवून सरकार दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित ३,००० रुपये खात्यात जमा करू शकते, अशी चर्चा राज्यातील महिलांमध्ये रंगली आहे.

२,१०० रुपयांच्या दाव्यांचे सरकारकडून खंडन Ladki Bahin ₹2100 government GR

आता महिलांना १५०० रुपयांऐवजी थेट २,१०० रुपयांचा हप्ता मिळणार आहेत. याबाबतचा नवीन शासन निर्णयही (GR) निघाल्याचा दावाही करण्यात येत होता. हा मेसेज सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत होता. पण या सर्व चर्चांवर आणि व्हायरल मेसेजवर आता सरकारकडून आणि प्रशासकीय स्तरावरून महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. हा मेसेज फेक असल्याचे सांगितलेय. सरकारने हे दावे फेटाळून लावले असून ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्यातरी पूर्वीप्रमाणेच १,५०० रुपयांची रक्कम मिळणार आहे.

ई-केवायसी (e-KYC) आणि कागदपत्रे अपूर्ण असल्यास लाभ थांबणार:

ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) किंवा आधार-बँक सीडिंग (DBT Active) पूर्ण नाही, त्यांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रोखले जाऊ शकतात. त्यामुळे शासनाकडून वारंवार कागदपत्रे अद्ययावत करण्याचे आवाहन केले जात आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबतचा निर्णय सरकारकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. १३ तारखेला राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत लाडक्या बहि‍णींना हप्ता देण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Shahi Tukda Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा,वाचा सोपी रेसिपी

Mug Cleaning Tips: बाथरुममध्ये वापरला जाणारा मग किती दिवसांनी बदलावा? डाग काढण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स

Traffic Update : दिल्लीमध्ये वाहतुकीत मोठा बदल, २२ प्रमुख मार्गांवर निर्बंध, ६ मेट्रो स्थानके बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT