Ladki Bahin Yojana Installment Date  Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: टेन्शन वाढवणारी बातमी, दीड लाख लाडकींचे १५०० रुपये कायमचे होणार बंद, महत्वाची अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्वाची बातमी आहे. त्यांना ३० एप्रिल २०२६ पर्यंत ई-केवायसीचे काम पूर्ण करायचे आहे. यासाठी आता फक्त ४ दिवस शिल्लक राहिले आहेत. हे काम पूर्ण न झाल्यास त्यांना पैसे येणं बंद होईल.

Priya More

Summary -

  • लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

  • ई-केवायसी न केल्यास १५०० रुपये होणार बंद

  • पालघरमध्ये १ ते दीड लाख लाडकींचे पैसे होणार बंद

फडणवीस सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे पालघरमधील दीड लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळणं बंद होणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये यापुढे १५०० रुपये येणार नाहीत. सरकारने लाडक्या बहिणींना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० एप्रिलपर्यतची मुदत दिली आहे. पण ही मुदत संपत आली तरी अनेक लाडकींचे हे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे त्या चिंतेत आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी मुदत वाढ मिळाली असली तरी देखील ३१ डिसेंबर २०२५ या मुदतीत ई-केवायसी केलेल्या लाभार्थी महिलांना दुरूस्तीची संधी देण्यात आली आहे. ई-केवायसी न झाल्यामुळे या लाडकींच्या खात्यात पैसे येणे बंद झाले होते. ई-केवायसीमध्ये दुरूस्ती करण्यासाठी त्यांना ३० एप्रिलपर्यंत मुदत वाढ दिली. या वेळेत हे काम पूर्ण होऊन पुन्हा लाभाचे पैसे मिळावे यासाठी लाडकींचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पालघर जिल्हा मुख्यालयातील महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. तरी देखील त्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. आता केवायसीसाठी फक्त ४ दिवस शिल्लक राहिले आहेत.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी जे अर्ज केले होते त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. या महिलांनी योग्य माहिती आणि अज्ञानामुळे खाते असलेल्या बँकेत जाऊन ई-केवायसी पूर्ण केली खरी पण लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरील इ-केवायसी करण्याचे काम राहून केले त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे येणं बंद झाले. या महिलांची संख्या १ लाखांच्या आसपास आहे. ही प्रक्रिया पूर्ण करता येत नसल्याने त्या नाराज झाल्या आहेत. हे काम करण्यासाठी त्यांनी अनेकदा महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयात चकरा मारल्या पण त्यांना घरी परत यावे लागले.

पालघर जिल्ह्यामध्ये ६ लाख २४ हजार ६५९ महिला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत. यामधील २५४ महिलांनी स्वत:हून या योजनेचा लाभ सोडला. तर ६५ हजार ५०२ महिलांना ३० एप्रिल २०२६ पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास एक ते दीड लाख लाभार्थी महिलांचा लाभ बंद झाला आहे. या महिलांनी पुढच्या ४ दिवसांत ईकेवायसीचे काम पूर्ण केले नाही तर त्यांचा खात्यात १५०० रुपये येणं कायमचे बंद होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शहापूरमधील रूग्णालयातच भिडले दोन गट, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण; डॉक्टर,नर्स उपचार सोडून पळाले

Monday Horoscope: घाईत निर्णय घेणं टाळा, 5 राशींच्या व्यक्तींना तब्बेतीची घ्या काळजी; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: जनता दरबारामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना अमरावती शहराध्यक्षांनी घातली हवा, व्हिडिओ व्हायरल

Accident: ​तापी नदीच्या पुलावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; वाढदिवसाच्या दिवशीच चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू

महागाई भत्ता वाढीबाबत नवीन अपडेट! केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची थकबाकी कधी जाहीर होणार, जाणून घ्या?

SCROLL FOR NEXT