Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: शासनाच्या यादीत नाव पण लाडकींच्या घराचे पत्ते खोटे, अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीतून धक्कादायक माहिती उघड

Ladki Bahin Yojana Reverification Process: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या घरी जाऊन पडताळणी केली जात आहे. यामधून महिलांची घराचा दिलेला पत्ता खोटा असल्याचे समोर आले आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या घरांचे पत्ते खोटे

लाडकी बहीण योजनेत महिलांनी जी माहिती भरली ती खोटी

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज बाद केले गेले आहेत. लाडकींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जात आहे. या योजनेत पडताळणीदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांनी आपले जे पत्ते लिहले आहेत ते खोटे निघाले आहेत. त्या ठिकाणी कोणीच राहत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची पडताळणी करत आहेत. या योजनेतून 26 लाख 30 हजार महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरु आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील एक लाख चार हजार 531 महिला आहेत.

लाडकींच्या घरचा पत्ता खोटा

दरम्यान, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची पडताळणी करत आहेत. शासन स्तरावरून प्राप्त याद्यांमध्ये लाभार्थी महिलांच्या शहर - तालुक्यांचीच नावे आहेत. त्यामुळे शहरी भागातील लाडक्या बहिणींचा शोध अंगणवाडी सेविकांना लागलेला नाही. त्यांची घरे सापडत नसल्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना दिलीय. त्यामुळे लाडक्या बहि‍णींच्या घराचाच शोध लागत नसल्याने लाडकी बहीण योजनेबाबत अनेक संभ्रम निर्माण झाला आहे.

अंगणवाडी सेविका कशी पडताळणी करतात? (Ladki Bahin Yojana Verification Process)

लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांची जिल्ह्यानुसार यादी काढण्यात आली आहे. या महिलांच्या घरोघरी जाऊन सर्व निकषात पात्र आहेत ती नाही ते चेक करतात. या महिलांच्या घरी चारचाकी वाहन नाही ना, कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला लाभार्थी नाहीत ना, महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नाही ना या सर्व गोष्टींची माहिती घेतात. याचसोबत महिला सरकारी कर्मचारी नाहीत तर याची माहिती घेतली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धुळ्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु

Cobra Rescue : सरपटत गेला अन् बियरच्या कॅनमध्ये अडकला; विषारी सापाच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Accident News : घरी परतताना काळाचा घाला; दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू

Road Accident Prediction Device: चालकाला डुलकी आली तरी नाही होणार दुर्घटना; ब्रेक लावून कारही थांबेल

Vivo V60e: जबरदस्त बॅटरी अन् दमदार फीचर्ससह Vivo V60e भारतात लाँच; किंमत किती?

SCROLL FOR NEXT