Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी फेब्रुवारीचा हप्ता येणार; अपात्र बहिणींचं काय? जाणून घ्या सविस्तर

Ladki Bahin Yojana February Month Installment: लाडकी बहीण योजनेत महिला फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट बघत आहे. फेब्रुवारीचा हप्ता कोणत्याची क्षणी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो.

Siddhi Hande

महायुती सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते. दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लवकरच लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने केलं आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यांपर्यंतचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. महिला आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहे. (Ladki Bahin Yojana News)

फेब्रुवारी महिना संपायला अवघे ३ दिवस उरले आहेत. अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली नाही. दरम्यान, लाखो अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यांना आता यापुढचा हप्ता मिळणार नाही. फेब्रुवारीचा हप्ता लवकर मिळण्याची अपेक्षा महिलांना आहे.

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अद्यापही मिळालेला नसल्याने महिलांमध्ये नाराजी पसरलेली दिसत आहे. या योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच पैसे दिले जाणार आहेत. परंतु अद्याप पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात हप्ता मिळणार की नाही अशी भीती महिलांच्या मनात निर्माण झाली आहे.

लाडकी बहीण योजनेत लाखो अपात्र महिला

लाडकी बहीण योजनेत ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. यामध्ये २१ ते ६५ वयोगटापेक्षा जास्त वयोगटातील महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांना पैसे मिळणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना पैसे मिळणार नाही. चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही. या महिलांना आतापासून १५०० रुपये मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT