Ladki Bahin Yojana Meta AI
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडक्या बहि‍णींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता; समोर आली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता २५ फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आवाहन महायुती सरकारने केले होते. दरम्यान, हे २१०० रुपये कधीपासून मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. लाडकी बहीण योजनेतून जवळपास ५ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्या महिलांना आतापासून पैसे मिळणार नाहीत. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. (Ladki Bahin Yojana)

फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही. परंतु या महिन्याल हप्ता २५ फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येऊ शकतो. मागील ३ महिन्यांपासून हा शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येत आहे. त्यामुळे या महिन्यातदेखील तेव्हाच हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. (Ladki Bahin Yojana News)

फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा आहे. त्यामुळे २८ दिवसांचा कालावधी लक्षात घेतला. महिना संपण्याआधी ४-५ दिवसात हे पैसे दिले जाऊ शकतात. परंतु हा हप्ता कोणत्या तारखेला येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.महिना अखेरपर्यंत पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात.

५ लाख महिलांचे अर्ज बाद

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ५ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. यामध्ये निकषांमध्ये न बसणाऱ्या अपात्र महिलांना वगळण्यात आले आहे. यात ज्या महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. चारचाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT