Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा, ८६ लाख महिलांना मिळाले नाही ₹१५००; कारण काय?

Ladki Bahin Yojana February Installment: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला आहे. दरम्यान, ८६ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

८६ लाख महिलांचे अर्ज बाद

या महिलांना मिळाला नाही फेब्रुवारीचा हप्ता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा केला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा झाले आहेत. महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत मात्र आता मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. याचसोबत लाखो महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांना फेब्रुवारीचे १५०० रुपये मिळाले नाहीत.

८६ लाख महिलांना हप्ता नाही (Ladki Bahin Yojana 86 Lakh Women Not Recieve February Installment)

लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत ८६ लाख महिलांना वगळण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेची सुरुवात २०२४ मध्ये झाली होती. तेव्हा सुरुवातीला २.४ कोटी महिला लाभार्थी होती. आता ही संख्या कमी झाली आहे. १.५ कोटींपर्यंत लाभार्थ्यांची संख्या आहे. तब्बल ८६ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. या महिलांना हप्ता मिळालेला नाही. या महिलांना जानेवारीचा हप्तादेखील मिळाला नव्हता.

हप्ता न मिळण्याचे कारण काय? (Ladki Bahin Yojana Installment not Recieved Reason)

लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळण्याची अनेक कारणे आहेत. निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना याआधीच योजनेतून वगळले आहे. फक्त २१ ते ६५ वयोगटातील महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. जर महिलांकडे चारचाकी वाहन असेल तरी त्यांना लाभ मिळणार नाही. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

याचसोबत सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करण्यास सांगितले आहे. केवायसी न केलेल्या महिलांची संख्या जास्त आहे. त्यांचाही लाभ बंद केले आहे. याचसोबत केवायसीत चूका झालेल्या महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. त्यांचा लाभ केवायसीतील दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा सुरु केला जाईल. तोपर्यंत महिलांना पैसे मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

पीएम किसान योजनेतून ४,००० नावे वगळली जाणार; शासनाकडून कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन, काय आहे कारण?

Kuttu Flour Puri Recipe : उपवासाची कुट्टूची पुरी बनवताना तुटते? पिठात मिसळा 'हा' पदार्थ, पुरी होईल कुरकुरीत अन् टम्म फुललेली

Chilled Water: थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या शरीरावर होणारे ७ परिणाम!

Gold Rate Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा सोनं 3,900 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT