Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात आता खटाखट ₹३००० येणार, कारण काय?

Ladki Bahin Yojana February And March Month Installment: लाडकी बहीण योजनेत आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र जमा केला जाणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत माबिती समोर आलेली नाही.

Siddhi Hande

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता ३००० रुपये एकत्र येणार आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेत फेब्रुवारी महिना संपला तरीही अद्याप महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये निराशा झाली आहे. दरम्यान, आता दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येणार आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचे १५०० रुपये आणि मार्च महिन्याचे १५०० रुपये एकत्र दिले जाणार आहे. दरम्यान, मार्च महिन्यात महिलांना २१०० रुपये देणार असल्याची चर्चा होत आहे. अर्थसंकल्पानंतर महिलांसाठी २१०० रुपये होण्याची घोषणा आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एकूण किती पैसे मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.

पडताळणीनंतरच पैसे

लाडकी बहीण योजनेत अर्जांच्या पडताळणीनंतरच महिलांना पैसे देणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, ही पडताळणी ५ टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. त्यातील काही अर्जांची पडताळणी झालेली आहे. यातून आतापर्यंत ९ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. एकूण ५० लाख महिलांचे अर्ज बाद करण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीचा हप्ता का आला नाही?

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे महिलांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नाही. आणि दुसरं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा न झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारण, मध्यंतरी एका कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितले होते की,लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या चेकवर सही करुन आलोय. आठ दिवसांत पैसे येतील. मात्र, अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Low BP Tips: उन्हाळ्यात लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी काय कळजी घ्यावी? 7 उपाय जाणून घ्या अन्यथा...

Vidhan Parishad Election : नाशिक विधानपरिषदेत मोठा ट्विस्ट; भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच, अचानक भाजपच्या गणेश गीतेंचा अर्ज दाखल

Accident: भाविकांवर काळाचा घाला, महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; ६ जणांचा जागीच मृत्यू

दीड फूट जागेवरून वाद टोकाला गेला; पोलीस कर्मचाऱ्यांकडून शेजारी कुटुंबाला बेदम मारहाण, गरोदर महिलेलाही सोडलं नाही

भरधाव ट्रक उलटला, १० मुलांसह १८ जणांचा जागीच मृत्यू; महामार्गावर रक्ताचा सडा

SCROLL FOR NEXT