Ladki Bahin Yojana eKYC Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ती एक चूक अन् लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० बंद; केवायसी करुनही पैसे नाही; कारण काय?

Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजनेत केवायसी करुनदेखील महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. पैसे न येण्यामागचे खरं कारण काय तुम्हाला माहितीये का?

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

केवायसी करुनदेखील १५०० रुपये आलेच नाहीत

पैसे न येण्यामागचे खरं कारण काय?

लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची दिसत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात डिसेंबरपर्यंतचे हप्ते जमा झाले आहेत. दरम्यान, काही महिलांच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे. महिला निकषात असूनही आणि केवायसी करुनदेखील पैसे न आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. नक्की अडचण कुठेय असा प्रश्न महिला विचारत आहे.

लाडक्या बहि‍णींना हप्ता का मिळाला नाही?

लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये काही चुका असल्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्याने या अडचणी येत आहेत, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. त्यामुळे केवायसी करताना काही तांत्रिक अडचणी आल्या असतील किंवा चुकीची माहिती दिली असेल तर त्यांचा लाभ बंद झाला आहे.

१५०० रुपये न मिळण्यामागचे कारण (Ladki Bahin Yojana why women not get 1500 Rupees)

लाडकी बहीण योजनेत केवायसी केल्यानंतरही पैसे जमा झाले नाही.यामागे केवायसीमध्ये अडचणी हे कारण आहे. परंतु त्याचसोबत आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नाही हेदेखील एक कारण आहे. जर आधार आणि बँक अकाउंट लिंक नसेल तर त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही हे काम केले नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.

महिलांना पैसे न मिळाल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय

केवायसीमध्ये त्रुटी असल्याने लाडक्या बहि‍णींना योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आता महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अंगणवाडी सेविकांमार्फत ही पडताळणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT