Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या eKYCसंदर्भात महत्त्वाची अपडेट; आदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana eKYC Helpline No: लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसंदर्भात महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता या महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय

लाडक्या बहिणींसाठी जारी केला हेल्पलाइन नंबर

महिलांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार

लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लाडकी बहीण योजनेतून अनेक लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही.लाभार्थ्यांनी केवायसी करुनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यावर आता राज्य सरकारने यावर तोडगा काढला आहे.महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानंतर आता पुन्हा आदिती तटकरेंनी मोठी घोषणा केली आहे.

आदिती तटकरेंनी केली घोषणा

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना केवायसीसंदर्भात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. तसेच अनेक महिलांनी केवायसी केलेले नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत. या सुविधेचं निवारण करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.

आदिती तटकरेंची पोस्ट (Aditi Tatkare Post on Ladki Bahin Yojana)

आदिती तटकरेंनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे. तरी, सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती, असं त्यांनी सांगितलं आहे.

लाडकी बहीण योजनेत आता महिलांना जर काही अडचणी आल्या तर त्यांनी हेल्पलाइन नंबरवर फोन करायचा आहे. १८१ या हेल्पलाइन नंबरवर फोन करायचा आहे. या फोनवरुन त्यांना तक्रारीचे निवारण मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Care Tips : लॅपटॉपची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या टिप्स

IND vs NZ: सूर्याला इशान किशनचा राग का आला होता? सामन्यानंतर भारताच्या कर्णधाराने केला खुलासा

Accident News : भंडाऱ्यात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; तीन महिन्यांच्या मुलीच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलं

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Smriti-Palash Wedding : स्मृतीसोबतच्या लग्नाआधी पलाश मुच्छल दुसऱ्या मुलीसोबत बेडवर, टीम इंडियाच्या पोरींनी चोपला अन्...

SCROLL FOR NEXT