Ladki Bahin Yojana KYC Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana eKYC: लाडक्या बहिणींनो eKYC पूर्ण झाली की नाही? फक्त २ मिनिटांत चेक करा स्टेट्स

Ladki Bahin Yojana eKYC Status: लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, आता तुमचे केवायसी पूर्ण झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइ पद्धतीने चेक करु शकतात.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी अनिवार्य

केवायसीसाठी उरले फक्त ३ दिवस

केवायसी पूर्ण झाले की नाही अशा पद्धतीने चेक करा

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. १८ नोव्हेंबरपर्यंत तुम्ही केवायसी करु शकतात. दरम्यान, आतापर्यंत लाखो महिलांनी ईकेवायसी केले आहेत. परंतु तुमचं केवायसी पूर्ण झालंय की नाही हे तुम्ही चेक करायला हवे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ई केवायसी स्टेट्‍स चेक करु शकतात.

लाडकी बहीण योजना ई केवायसी स्टेट्‍स (Ladki Bahin Yojan eKYC Status)

लाडकी बहीण योजनेत ई केवायसी झाली की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. त्यासाठी तुम्हाला एक सोपी पद्धत वापरायची आहे.

सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर तिथे ई केवायसी असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

यानंतर केवायसीवर जाऊन तुम्हाला वेबसाइटवर आधार नंबर टाकायला सांगतील. तुम्ही आधार नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे. तुमच्या आधारशी लिंक मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकावा.

यानंतर तुमचे जर केवायसी पूर्ण झाले असेल तर तुमचे केवायसी पूर्ण झाले आहे, असा मेसेज दिसेल. जर तुमचे केवायसी पूर्ण झाले नसेल तर पुढील प्रोसेस सुरु होईल.

यानंतर तुम्हाला तुमच्या पती किंवा वडिलांचे केवायसी पूर्ण करायचे आहे. यासाठी त्यांचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.

ई केवायसीसाठी अवघे ३ दिवस उरले (Ladki Bahin Yojana KYC Deadline)

लाडकी बहीण योजनेत ई केवायसी करण्यासाठी अवघे ३ दिवस उरले आहेत. तुम्ही लवकरात लवकर ईकेवायसी करायची आहे. ई केवायसी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही आवाहन केले आहे. जर तुम्ही ई केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.सर्व लाभार्थी महिलांना ईकेवायसी करणे अनिवार्य केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: भाजप कामाठीपुऱ्याबाहेर उभा, त्यांना कुणीही चालते; संजय राऊतांचा गंभीर आरोप

EPFO Pension Hike: EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किमान पेन्शन ५ पटीने वाढणार; १००० वरुन थेट ५००० होणार

Maharashtra Live News Update: १० दिवसांत भाजपला सोडचिठ्ठी, माजी आमदार नितीन भोसले यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश

Moogache Birde Recipe : थंडीत बनवा गरमा गरम झणझणीत हिरव्या मुगाचे बिरडे, वाचा सोपी रेसिपी

Agniveer Permanent Soldier: परमनंट व्हायचंय? अग्निवीरांनो लग्न विसरा! अग्निवीरांसाठी आता नवा मापदंड

SCROLL FOR NEXT