Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची पडताळणी होणार, ई-केवायसी करावीच लागणार, अन्यथा ₹१५०० विसरा

Majhi Ladki Bahin Yojana KYC Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता केवायसी करणे गरजेचे आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी अनिवार्य

योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी केवायसी गरजेचे

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतून २६ लाख ३४ हजार बोगस महिलांनी लाभ घेतला आहे. यामुळे सरकारने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बोगस लाभार्थ्यांनी सरकारचे कोट्यवधी रुपये लाटले आहेत. यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

लाडक्या बहिणींना केवायसी अनिवार्य (Ladki Bahin Yojana KYC Mandatory)

या २६ लाख ३४ हजार महिलांपैकी सर्वाधिक बोगस महिला या पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतल आहे. सरकारने पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी करणे मोठा निर्णय घेतला आहे. ई-केवायसी करुन फेरपडताळणी केली जाणार आहे. यामुळे जर अजून बोगस लाभार्थी असतील तर त्यांची माहिती समोर येणार आहे. या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे.

जून महिन्यापासून जवळपास २६ लाख महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत २ कोटी ६३ लाख महिलांनी लाभ घेतला आहे. त्यापैकी आता फक्त २ कोटी ४१ लाख महिलांना लाभ मिळणार आहे.

योजनेतील गैरप्रकार थांबावा आणि फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सर्व महिलांना ई-केवायसी करावे लागणार आहे. ई-केवायसी पूर्ण करणाफ्या महिलांनाच योजनेत पुढचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच ही प्रोसेस सुरु केली जाईल.

अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी

सध्या लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरु आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करत आहे. महिलांच्या घरोघरी जाऊन त्या निकषांमध्ये बसतात की नाही ते चेक करतात. त्यानंतर महिलांना योजनेतून बाद केले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Duplicate Voter Verification: निवडणुकांच्या तारखा लवकरच? दुबार मतदारांना चाप, आयोगाचे घरोघरी तपासणीचे आदेश|VIDEO

प्रणित मोरे 'Bigg Boss 19'मध्ये पुन्हा येणार? सलमान खान काय म्हणाला? वाचा सविस्तर

Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? १५ जिल्ह्यात धो धो पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट

Maharashtra Live News Update: पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तूर्तास स्थगित

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज, बँक खात्यावर आजपासून ₹१५०० खटाखट जमा होणार, बॅलेन्स चेक करा

SCROLL FOR NEXT