Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना eKYC साठी २ महिन्यांची मुदतवाढ मिळणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Ladki Bahin Yojana KYC Deadline Extension: लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी करण्यासाठी शेवटचा १ दिवस उरला आहे. दरम्यान, आता केवायसीसाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार

१ कोटी १० लाख महिलांची केवायसी बाकी

केवायसीसाठी उरला शेवटचा १ दिवस

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी १ दिवसाची मुदत उरली आहे. आता सर्व लाडक्या बहि‍णींना केवायसी करणे अनिवार्य आहेत. यासाठी उद्या म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी मुदत संपणार आहे. दरम्यान, अजूनही राज्यातील लाखो कोट्यवधी महिलांची केवायसी बाकी आहे. त्यामुळे आता सरकार केवायसीसाठी मुदतवाढ देणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार

लाडकी बहीण योजनेत १ कोटी १० लाख महिलांची केवायसी होणे बाकी आहे. केवायसीसाठी शेवटचा १ दिवस उरला आहे. त्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या काळात सरकारला महिलांची नाराजी परवडणारी नाही. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत ई केवायसीसठी मुदतवाढ मिळेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

५० लाख महिलांचै अर्ज बाद

लाडकी बहीण योजना सुरु होऊन वर्ष उलटून गेले आहे. या योजनेत जवळपास २ कोटी ९ लाख महिलांनी अर्ज केले होते. दरम्यान, त्यानंतर महिलांची पडताळणी करण्यात आली. ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही त्यांचे लाभ बंद करण्यात आले आहे. सुमारे ५० लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. यामध्ये चारचाकी वाहने, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला, सरकारी कर्मचारी, दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असणारे लाभार्थी अशा सर्व लाभार्थ्यांचे अर्ज बाद केले आहेत.

लाडकी बहीण योजनेत आता अजून काही महिलांचे लाभ बंद होणार आहेत. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचे लाभ बंद होणार आहे. याचसोबत आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.याचसोबत ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही, अशा महिलांच्या केवायसीसाठी वेबसाइटमध्ये बदल केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast Update : बहि‍णीकडे जातो म्हणून निघाला अन् दिल्लीत पोहचला, बॉम्बस्फोटावेळी मशिदीत मुक्काम, अकोल्यात येताच....

Maharashtra Live News Update: बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिलं नाही- राज ठाकरेंची पोस्ट

पुण्यात अजित पवार गटाला जबरदस्त धक्का; स्थानिक नेतृत्वाला कंटाळून पक्षाला जय महाराष्ट्र करणार

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पेन्शधारकांना महागाई भत्ता मिळणार नाही? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Pune Accident: पुण्यात भयंकर रेल्वे अपघात, धावत्या ट्रेनने ३ तरुणांना चिरडलं

SCROLL FOR NEXT