Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत e KYC करताना एरर येतोय? मग या वेळेत करा काम

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे गरजेचे आहे. केवायसी करताना जर अडतणी येत असतील तर हा उपाय करा.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे अनिवार्य

ऑनलाइन प्रोसेस सुरु

ई केवायसी करताना अनेक अडचणी

ओटीपी येत नाहीये तर हा उपाय करा

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. यासाठी ऑनलाइन प्रोसेस सुरु केली आहे. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी होणार आहे. जर केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, यावर आता उपाय काढण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना अडचणी

लाडकी बहीण योजनेत ऑनलाइन पोर्टलवर जाऊन ई केवायसी करावी लागते. दरम्यान, ई केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे ओटीपीदेखील येत नाही. त्याचसोबत साइटवर लोड येत असल्याने केवायसी करण्यासाठी अडचणी येत आहे. यावर आता एक उपाय समोर आला आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसी प्रक्रिया आता सुरु झाली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी एकाचवेळी केवायसीसाठी लॉग इन करायला गेली. त्यामुळे साइटवर लोड आला. यामुळे एकाचवेळी अनेक महिलांना केवायसी करण्यात येत नाही. त्यामुळे यावर एक उपाय शोधून काढण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांनी केवायसी करताना घाई करायची नाही. त्यांनी अचून माहिती भरायची आहे. जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुमचा योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नियमांचे पालन करुन केवायसी करा.

उपाय काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ई केवायसी करताना अनेक लाभार्थी एकाचवेळी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे साइटवर लोड येतो. अशावेळी रात्री १२नंतर किंवा पहाटे ४ ते५ वाजताच्या दरम्यान ई केवायसी करण्याचा सल्ला दिला आहे. या काळात तुमची केवायसी प्रोसेस जलद होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT