Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment come on These Date: लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. या महिलांना मकरसंक्रांतीपूर्वी ३००० रुपये येऊ शकतात.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारीचा हप्ता एकत्र येणार

दोन महिन्यासाठी अर्थ विभागाकडे निधी मागितला

३००० रुपये कधी येणार? लाडक्या बहिणींना प्रतिक्षा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार आबहे. मकरसंक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरु आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने अर्थ मंत्रालयाकडे निधी मागितल्याची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास विभागाने ६,७०० कोटी रुपयांचा निधी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

निवडणुकीच्या काळात दिले जाणार पैसे (Ladki Bahin Yojana Installment come on these date)

राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा हप्ता महापालिका निवडणूकीआधी दिला जाणार आहे. ही योजना मागच्या वर्षी विधानसभा निवडणूकीपूर्वी ही योजना सुरु केली होती. यानंतर योजनेच्या निर्णयानुसार,दर महिन्याला १० तारखेपर्यंत लाभ वितरित केला जाईल, असं नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता कधीही महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. महापालिका निवडणुका १५ जानेवारीला आहेत. परंतु ही योजना जुनी आहे त्यामुळे लाभ वितरित करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या वेळीदेखील आचारसंहिता लागू होती. तरीही ऑक्टोबरचा हप्ता देण्यात आला होता. दरम्यान, आतादेखील पैसे देण्यात येतील, असं बोललं जात आहे. परंतु आता निवडणुकीपूर्वी वितरित होणाऱ्या हप्त्यासंदर्भात काँग्रेसने निवडणुक आयोगाला पत्र लिहलं आहे. त्यामुळे आता महिलांना लाभ मिळणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

लाडकी बहीण योजनेत एकूण २.२३ कोटी लाभार्थी आहेत. यातील ९३ लाख महिला या शहरी भागातील आहेत. या महिलांना दोन महिन्याचा हप्ता देण्यासाठी ६,६९० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; पक्ष प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT