Ladki Bahin Yojana  Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पुन्हा सुरू होणार का? महत्त्वाची अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana latest update : लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र ठरल्यानंतर पुन्हा नोंदणी सुरू होणार का? ई-केवायसी मुदतवाढ, नवीन अर्ज आणि लाभार्थी पडताळणीबाबत सरकारने दिलेले स्पष्ट उत्तर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. नियमांची कडक पडताळणी केल्यामुळे तब्बल ८० लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आधी २ कोटी ४६ लाख असणारी लाभार्थी महिलांची संख्या आता थेट १ कोटी ६६ लाखांवर आली आहे. ईकेवायसीनंतर ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत किंवा ज्यांना फॉर्म भरता आलेला नाही, त्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे, योजनेची नोंदणी पुन्हा सुरू होणार का?

पुन्हा नोंदणी सुरू होणार का?

'टाइम्स ऑफ इंडिया'ने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू होणार नसल्याचे वृत्त दिले आहे. सध्या तरी लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी किंवा अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. ३० एप्रिल रोजी ई-केवायसी (e-KYC) करण्याची अंतिम मुदत संपली आहे. अनेक महिलांनी मुदत वाढवून मिळण्यासाठी सरकारकडे विनंत्या केल्या आहेत. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, “ई-केवायसीची मुदत वाढवण्याचा किंवा नवीन नोंदणी सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नाही. महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधीच पुरेसा वेळ देण्यात आला होता.” त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार, नवीन फॉर्म भरणे किंवा अपात्र झालेल्या महिलांना पुन्हा नाव नोंदवणे शक्य होणार नाही.

८० लाख महिला का ठरल्या अपात्र?

  • ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केली नाही.

  • ३० एप्रिलच्या आत ज्या महिलांनी आपले आधार कार्ड आणि बँक खाते लिंक केले नाही, त्यांचे नाव यादीतून कट झाले.

  • फॉर्म भरताना बँक डिटेल्स किंवा कागदपत्रे अपूर्ण असणे.

  • योजनेचे नियम आणि उत्पन्नाची अट पूर्ण न करू शकणे.

  • पैसे मिळणे अचानक बंद, महिलांची व्यथा

ईकेवायसीची मुदत संपल्यानंतर ज्या महिलांचे पैसे अचानक थांबले आहेत, त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पुणे जिल्ह्यातील माया वाघमारे यांनी सांगितले की, “मी सर्व कागदपत्रे दिली होती, तरीही माझे नाव यादीतून काढून टाकण्यात आले. माझ्या घरखर्चासाठी हे पैसे खूप महत्त्वाचे होते.” दरम्यान, लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार आहे, पण ज्या महिलांचे फॉर्म मंजूर आहेत, केवळ त्यांनाच याचे पैसे मिळत राहतील. मुदत संपल्यामुळे नवीन नोंदणी किंवा दुरुस्ती होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT