Ladki Bahin Yojana google
बिझनेस

Ladki Bahin Yojana : "आम्हाला लाभ नको!" जळगावातील हजारो महिलांचा 'लाडकी बहीण' योजनेला नकार, कारणही सांगितले

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : जळगाव जिल्ह्यातील सुमारे दोन हजार महिलांनी ई-केवायसी, कठोर पात्रता निकष आणि सतत पडताळणीच्या त्रासामुळे मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज सादर केला आहे.

Saam Tv

जळगाव जिल्ह्यातील दोन हजार लाडक्या बहिणींना नकोय लाभ

जाचक अटींमुळे योजनेकडे पाठ; 'लाभ नको' साठी दिले अर्ज; सुमारे दोन लाख बहिणी 'अपात्र

नको ती 'किटकिट' म्हणत दिले अर्ज

हृषीकेश काळे, साम टिव्ही

लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जळगाव, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत ज्यांनी अगोदर अर्ज भरले होते, त्यांना पैसे मिळाले. नंतर मात्र ई-केवायसी करा, ते करण्यासाठी अनेक वेळा संबंधित कार्यालयात चकरा मारा, तासन्‌तास रांगेत उभे राहूनही ई-केवायसी झाली नाही की पुन्हा दुसर्‍या दिवशीचा रोजगारही बुडतो आणि ई-केवायसीचे कामही होत नाही. त्यात शासन या-ना त्या कारणांनी अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र करीत आहे. यामुळे 'नको' ती किटकिट असे सांगत जिल्ह्यातील सुमारे दोन हजार 'लाडक्या बहिणीं'नी योजनेचा लाभ नको, असे अर्ज केले आहेत.

राज्य शासनाने २८ जून २०२४ रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यानंतर अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली. १७ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यातून या योजनेचा औपचारिक शुभारंभ झाला. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून ₹३,००० पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात १४ ऑगस्ट २०२४ रोजी जमा करण्यात आले.

जिल्ह्यात सुरवातीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत सहा लाखांपेक्षा जास्त महिलांनी अर्ज भरले होते. त्या सर्व महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्यात आले. महाराष्ट्रात २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ ला एकाच टप्यात पार पडली. २३ नोव्हेंबर २०२४ ला निकाल लागला. जुलै २०२४ मध्ये योजना सुरूकरून महिलांच्या खात्यात हप्ता जमा केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये या निवडणुका झाल्या.

जळगाव जिल्ह्यातील १ लाखांपेक्षा जास्त महिलांचे हप्ते रखडले होते. ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या किंवा उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणान्या महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. राज्यभरातून प्राथमिक २ कोटी ४० लाख अर्जांपैकी पडताळणीनंतर १ कोटी ६६ लाख महिला अपात्र ठरल्या असून उर्वरित अर्ज बाद झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील दहा लाख महिलांनी अर्ज भरले होते. त्यातील दीड ते दोन लाख अर्ज अपात्र झाले आहेत. ६५ वर्षाच्या आतील महिलाही लाभ नको म्हणून अर्ज देत आहेत.

माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, योजनेच्या अंमलबजावणीत आता अधिक काटेकोरपणा आणण्यात आला आहे. विशेषतः ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांचे लाभ बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २०२४ मध्ये अर्ज केले होते. त्यातील सुमारे दीड ते दोन अर्ज अपात्र झाले आहेत. आता महिला या योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज देत आहे. कदाचित त्या संजय गांधी योजनेच्या लाभात असाव्यात, असे वाटते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT