Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, फक्त याच महिलांना मिळणार ₹१५००

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली. त्यामुळे आता फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट

लाडकीच्या अर्जांची पडताळणी सुरु

फक्त या महिलांनाच मिळणार लाभ

लाडकी बहीण योजनेत महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत फक्त निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे.

फक्त याच महिलांना मिळणार पैसे (Only These Women Will Get 1500 Rupees Under Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर पात्र नसाल तर तुम्हाला यापुढे पैसे मिळणार नाही.

पात्रता (Ladki Bahin Yojana Eligibility Check)

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक.

२१ ते ६५ वयोगटातील महिलांना मिळणार लाभ

एका कुटुंबातील दोन महिलांनाच मिळणार लाभ

लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे

लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे

तुम्ही पात्र आहात का? (Ladki Bahin Yojana Weather you will recieve money or not)

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहे. लाभार्थी महिलांची पडताळणी सुरु केली आहे. त्यातील अनेक महिलांनी निकषांबाहेर जाऊन अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे अर्ज बाद केले आहेत. याचसोबत अंगणवाडी सेविकांनी महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली आहे. यातून एका कुटुंबातून एकापेक्षा जास्त लाभ घेत असणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले आहे. त्यांच्याकडे चारचाकी वाहन असेल तर त्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यातील मध्य रेल्वे फलाट क्रमांक २, ३ आणि ४ची लांबी वाढवणार

8th Pay Commission: पगार ५०,००० वरुन १,००,००० होणार; आठव्या वेतन आयोगानंतर सॅलरीचं कॅल्क्युलेशन वाचा

Worst foods to eat with eggs: चुकूनही अंड्यासोबत हे ५ पदार्थ नाश्त्यामध्ये खाऊ नका

Local Body Election: प्रचार जोरात होणार! इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

Halloween : हॅलोवीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT