Mazi Ladki Bahin Yojana: ₹1,500 July Installment Payment Update AI Image
बिझनेस

Ladki Bahin Yojana : ₹1500 की ₹3000? रक्षबांधनाआधी लाडकीच्या खात्यावर हफ्ता जमा, बँक बॅलन्स आताच चेक करा

Ladki Bahin Yojana Update News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याला सुरुवात झाली आहे. पात्र महिलांनी बँक खाते, DBT आणि e-KYC स्थिती तपासा.

Alisha Khedekar

  • लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या ₹1,500 हप्त्याचे वितरण

  • पात्र महिलांच्या खात्यात पैसे DBT पद्धतीने टप्प्याटप्प्याने जमा

  • लाभार्थींनी बँक बॅलन्स, आधार लिंकिंग आणि e-KYC स्थिती तपासणे महत्त्वाचे

राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मंगळवारपासून अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये या योजनेचा निधी थेट DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने जमा केला जात आहे. काही महिलांना त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे बँकेचे मेसेजही आले आहेत. मात्र, सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी रक्कम जमा होणार नसून तांत्रिक प्रक्रियेनुसार पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने पैसे येणार आहेत. या हप्त्याचा लाभ राज्यातील तब्बल १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या महिलांनी योजनेच्या नियमांनुसार पात्रता पूर्ण केली आहे, त्यांनी आपल्या बँक खात्याचा बॅलन्स तपासून पाहावा. मोबाईल बँकिंग, UPI अॅप, एटीएम किंवा बँकेच्या अधिकृत माध्यमातून खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही, हे सहज तपासता येईल.

दरम्यान, योजनेतील लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यासाठी सरकारकडून अर्जांची छाननी आणि e-KYC प्रक्रिया करण्यात आली आहे. या पडताळणीमध्ये मोठ्या संख्येने महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या केवळ योजनेच्या अटी व नियमांमध्ये बसणाऱ्या पात्र महिलांनाच हप्त्याचा लाभ दिला जात आहे.

विशेष म्हणजे, काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले दिसत नसल्यास त्यांनी लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. निधी हस्तांतरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असल्याने पुढील काही दिवसांत रक्कम जमा होऊ शकते. मात्र, बँक खाते आधारशी लिंक आहे का आणि e-KYC पूर्ण आहे का, याची खात्री करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांनी आपला बँक बॅलन्स आताच तपासावा आणि १५०० रुपयांचा हप्ता खात्यात जमा झाला आहे का, याची खात्री करून घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल गांधींच्या परीक्षेत 50% सचिव नापास; परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेस यश मिळणार?

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT