Augest installment ladki bahin yojana meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ४ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा होणार, ऑगस्टच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

Maharashtra Government : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट आहे. ऑगस्टचा १,५०० रुपयांचा हप्ता १६ किंवा १७ सप्टेंबरपासून जमा होण्याची शक्यता असून, उशीर झाल्याने दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळू शकतात.

Sakshi Sunil Jadhav

Ladki Bahin Yojana August Installment: लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत झालेय. प्रत्येक घरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. गुरूवारी गौरीचेही आगमन होईल. याच आनंदाच्या आणि उत्सावात राज्य सरकारकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढील काही दिवसात ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारकडून हप्त्याची प्रक्रिया १६ किंवा १७ तारखेंपासून सुरू केली जाईल. त्यानंतर टप्प्या टप्प्याने प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.

किती महिलांना लाभ मिळणार?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना थेट आर्थिक मदत मिळत असल्याचं सांगितलं जातं. रक्षाबंधनाच्या काळात सरकारने जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला होता. आता गणेशोत्सव आणि गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टचा हप्ता देण्याची शक्यता आहे.

दरम्यान ऑगस्टचा हप्ता २० सप्टेंबरपर्यंत जमा झाला नाही, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याची शक्यता असल्याचे सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीत महिलांच्या खात्यात एकूण ३००० रुपये जमा होऊ शकतात. मात्र, याबाबत अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

त्यामुळे ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता गौरी आगमनापूर्वी मिळणार की दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार, याकडे राज्यातल्या लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT