Ladki Bahin Yojana August Installment google
बिझनेस

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Ladki Bahin Yojana August Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या ₹1,500 हप्त्याची लाभार्थी महिला वाट पाहत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार १० सप्टेंबरनंतर प्रक्रिया आणि १६ सप्टेंबरनंतर निधी जमा होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana August Installment Date Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा सन्मान निधी महिलांच्या खात्यावर कधी वर्ग होणार (when will Ladki Bahin August installment be credited), याकडे संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींचे डोळे लागले आहेत. ऑगस्ट महिना संपून आता सप्टेंबर महिना सुरू झाला आहे, परंतु अद्याप या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. अशातच आता या हप्त्याच्या वितरणाबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. (Ladki Bahin Yojana August 2026 ₹1500 installment date)

गणेशोत्सवात गौरी आगमनावेळी मिळणार Ladki Bahin ₹1500 August payment latest news

सूत्रांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना गणेशोत्सवाच्या काळात देण्याची राज्य सरकारची योजना आहे. विशेषतः गौरीच्या आगमनाचे औचित्य साधून हा निधी थेट महिलांच्या बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत महिलांना आर्थिक दिलासा मिळणार असून, यंदाची गौरी-गणपतीची पूजा अधिक आनंदाची ठरणार आहे.

१६ सप्टेंबरनंतर खात्यावर जमा होणार पैसे?

प्रशासकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर २०२६ नंतरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निधीच्या वितरणावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

१० सप्टेंबरपासून निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार

या योजनेची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू आहेत. १० सप्टेंबर २०२६ नंतर बँकेत निधी हस्तांतरित (Fund Transfer) करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील.

जुलैचा हप्ता रक्षाबंधनाला, तर ऑगस्टचा हप्ता गौरी गणपतीत

याआधी राज्य सरकारने जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यावर जमा केला होता. त्याच धर्तीवर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता गणेशोत्सवातील गौरी आगमनाच्या काळात देऊन महिलांना सणाचे गिफ्ट देण्याची तयारी सरकारने केली आहे.

अनेक महिला या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असून, पुढील आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबतची अधिकृत आणि अंतिम घोषणा सरकारकडून केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT