Mukhyamantri Ladki Bahin Yojana Saam TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! आता 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ४५०० रुपये; कसं? जाणून घ्या

Women Will Get 4500 Rupees Under Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जात होते. मात्र, काही महिलांना आता ४५०० रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. या योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट होती.मात्र, ही मुदत आता वाढवण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत महिला या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता आला नाही त्या महिला आता अर्ज करु शकतात. या योजनेत सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना आधीच्या दोन महिन्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचाही हप्ता मिळणार आहे.म्हणजेच महिलांना एकूण ४५०० रुपये मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना मदत केली जाते. या योजनेत २.५ कोटी महिलांचा समावेश केला जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी घोषणा केली होती. राज्य सरकारने आतापर्यंत १.७ कोटी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेत निधी जमा केला आहे.

लाडकी बहीण योजना

या योजनेत २१ ते ६५ वयोगटातील महिला, अवावहित महिला, विधवा या महिला अर्ज करु शकतात. अर्जदार महिलांच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT