Ladaki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या कामाची बातमी! लाखांचं कर्ज झटक्यात, व्याज मात्र शून्य

Maharashtra Government Scheme Like Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी अजून एक योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज दिले जाते.

Siddhi Hande

लाडकींसाठी अजून एक योजना

स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळतंय कर्ज

कोणत्याही व्याजाशिवाय मिळणार कर्ज

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. दरम्यान, आता सरकारने महिलांसाठी आणखी एक योजना राबवली आहे. महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे. जेणेकरुन महिला स्वतः चा व्यवसाय सरु करतील आणि स्वतः च्या पायावर उभे राहतील.

महिलांना आता १ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आणि परिसरातील अनेक महिलांना या योजनेअंतर्गत पैसे दिले आहेत. याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

आता महिलांना व्यवसायासाठी कर्ज देण्यात येणार आहे. यावर ० टक्के व्याजदर आकारले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुंबई बँकेने ३ सप्टेंबरपासून महिलांसाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेत १ लाखांपर्यंतचे कर्ज कोणत्याही व्याजाशिवाय मिळते आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रातही ही योजना सुरु होऊ शकते. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

आदिती तटकरेंनी दिली माहिती

आदिती तटकरेंनी स्वतः या योजनेबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेमार्फत हे पाऊल उचलण्यात आले आहे. यातून बँकेने व्यावसायिक कर्ज योजनेतून ५७ महिलांना कर्ज दिले आहे. याच चेकचे वाटप आदिती तटकरेंनी केले आहे. हा धनादेश फक्त आर्थिक मदत नव्हे तर ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या उद्योजकतेला आणि आत्मविश्वासाला बळ देणारं आहे, असं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

SCROLL FOR NEXT