Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! या जिल्ह्यातील ५२ हजार महिलांचे अर्ज बाद; तुमचं तर नाव नाही ना?

Ladki Bahin Yojana 52 Thousand Women Ineligible: लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून ५२हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद

यवतमाळमधील ५२ हजार महिलांचे अर्ज बाद

लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता राज्यातील आणखी काही महिला योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांना योजनेत दर महिन्याला १५०० रुपये मिळणार नाहीयेत. दरम्यान, यवतमाळमधील ५२ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांना आता योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.

यवतमाळमधील ५२ हजार महिलांचे अर्ज बाद

यवतमाळ जिल्ह्यातील 52 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी शासनाची दिशाभूल करीत मदतीचा लाभ मिळवला आहे, असा अहवाल अंगणवाडी सेवकांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. लवकरच यातील अंतिम अहवालावर शिक्कामोर्तब होणार असून जिल्ह्यात सात लाख लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते. यातील 52 हजार लाडक्या बहिणींचा रिजेक्ट अहवाल महिला बालकल्याण विभागाकडे सादर करण्यात आला आहे.

अंगणवाडी सेविका करतात पडताळणी

राज्याच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन लाभार्थी महिलांची छाननी करत आहे. यात घरात २ पेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत नाही ना, त्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे का, महिला सरकारी कर्मचारी नाही ना अशा सर्व निकषांची पडताळणी केली जाते.

या पडताळणीतून लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. या महिलांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांचे अर्ज योजनेतून बाद केले जाणार आहेत. याआधी आदिती तटकरेंनी माहिती दिली होती की, राज्यातील २६ लाखांपेक्षा जास्त महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. आता या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : 'ब्रेस्ट सर्जरी केली का?'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या VIDEO नं सोशल मीडियावर धुमाकूळ, नेटकऱ्यांच्या मनात शंकांचं काहूर

Maharashtra Live News Update : विधानभवनाबाहेर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! सरकारी कर्मचाऱ्यांना २० महिन्यांचा एरिअर एकत्र मिळणार? जाणून घ्या कॅल्क्युलेशन

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल, प्रसिद्ध मंदिराकडे जाणारा रस्ता बंद; कोणते आहेत पर्यायी मार्ग?

Evil Eye Anklets Design: नजर लागू नये म्हणून पायात घाला 'इव्हिल आय एंकलेट', लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न

SCROLL FOR NEXT