Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹४५०० रुपये खटाखट येणार? ३ महिन्याचा हप्ता एकत्र देणार; कारण काय?

Ladki Bahin Yojana ₹4500 Come Together: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता लाडक्या बहिणींना तीन महिन्याचे हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

लाडक्या बहिणींना ₹४५०० रुपये एकत्र येणार का?

नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता पुढच्या ३ महिन्याचे हप्ते एकत्रितपणे येऊ शकतात. लाडकीच्या खात्यात आता ४५०० रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता येऊ शकतो.

लाडकीच्या खात्यात ४५०० रुपये येणार? (Ladki Bahin Yojana 4500 Rupees Come Together)

लाडकी बहीण योजनेत महिलांना तीन हप्ते एकत्र येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेत प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जातात. नुकताच ऑक्टोबरचा हप्ता वितरित करण्यात आला आहे. त्यानंतर महिला नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारत आहेत.

लाडक्या बहि‍णींना ३ हप्ते एकत्र येण्यामागची कारणे (Ladki Bahin Yojana 3 Installment Come Together)

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. काल निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. एकूण ३ टप्प्यात निवडणूका होती. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, नोव्हेंबरमध्ये आता नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या. त्यानंतर लगेचच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. या काळात आचारसंहिता लागू असेल. आचारसंहितेच्या काळात कोणत्याही योजनेअंतर्गत निधी दिला जात नाही. त्यामुळे कदाचित महिलांना त्याआधीत एकत्रितपणे ४५०० रुपये दिले जाऊ शकतात.

विधानसभा निवडणूकीपूर्वीही दिले होते पैसे

मागच्या वर्षी विधानसभेच्या निवडणूका ऑक्टोबर महिन्यात जाहीर झाल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात निवडणूका झाल्या होत्या. त्यामुळे त्यावेळी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र दिले होते. त्यामुळेच यावेळीदेखील पैसे एकत्र येऊ शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! मुदत वाढवली पण eKYCची प्रक्रिया कशी पूर्ण करणार? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Famous Actor : मधुचंद्राच्या रात्रीचा सीन करताना अभिनेता थरथर कापत होता, नंतर ढसाढसा रडला; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा

Maharashtra Weather : मुंबई-पुण्यात कडाक्याचे ऊन, पण विदर्भात अवकाळीचा इशारा; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Pune Fort : सात भक्कम दरवाजे अन्..., 'या' ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवरायांनी घडवलाय इतिहास

Maharashtra News Live Update: राज्याला अवकाळी पावसाने मोठे नुकसान, 2 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके बाधित

SCROLL FOR NEXT