Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून ४२ लाख महिला अपात्र, ६८०० कोटींची सरकार वसुली होणार?

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. जवळपास ४२ लाख महिला अपात्र असल्याचे समोर आले आहे. आता या महिलांवर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

  • लाडकी बहीण योजनेतून ४२ लाख महिला अपात्र

  • ६८०० कोटी रुपये अपात्र महिलांवर खर्च

  • आता सरकार कारवाई करणार का?

लाडकी बहीण योजनेतील अनेक घोटाळे समोर आले आहेत. लाडकी बहीण योजनेत लाखो अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. या महिलांवर आता कारवाई होणार का असा असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाडकी बहीण योजनेत अनेक पुरुषांनीही लाभ घेतला आहे. १४ हजार पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांच्या नावावर आतापर्यंत ६८०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान, आता महिलांकडून वसुली होणार असल्याचे बोलले जात आहे.

लाडकी बहीण योजनेत तब्बल ४२ लाख अपात्र लाभार्थ्यांना लाभ घेतला आहे. गेल्या ११ महिन्यात त्यांना दर महिन्याला १५०० रुपये दिले गेले आहेत.यासाठी एकूण ६ हजार ८०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे आता या महिलांवर कारवाई करावी का यावर चर्चा सुरु आहे.

अपात्र अर्जदाराच्या स्वयंघोषणापत्राचा आधार घेऊन त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येणार असून त्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर विचारविनिमय सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सरकार पातळीवरून घाई झाल्याने कोणीच अर्जातील माहितीची काटेकोरपणे पडताळणी केली नाही. यामुळे लाखो अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सरकारला आर्थिक फटका बसला आहे.

दरम्यान, ज्या १४ हजार पुरुषांनी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु आता या जवळपास ४२ लाख अपात्र महिलांविरोधात सरकार कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महिलांकडून पैसे वसूल केले जाणार का? त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT