Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून मिळालेच नाहीत, असू शकतात ही कारणे

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. महिलांच्या खात्यात पैसे जमा न होण्यामागे काही कारणे आहेत.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे. या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत. परंतु अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे अजूनही जमा झाले नाहीत.

ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्यांना दोन महिन्याचे ३००० रुपये जमा झाले आहेत. परंतु अनेक महिलांचे फॉर्म भरुनही पैसे आले नाहीत. यामागे काही कारणे आहे. तुम्ही जर काही चुकीची माहिती भरली असेल तरच तुम्हाला पैसे आले नसतील.

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतरही पैसे न येण्याची कारणे

  • लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेल्या महिलांचे बँक अकाउंट आधारशी लिंक नसणे.बँक अकाउंट लिंक नसल्याने पैसे जमा होत नाही.

  • चुकीची माहिती भरल्यास तुमच्या अकाउंटला पैसे येत नाही.

  • लाडकी बहीण योजनेच्या काही अटी आहेत. या अटींमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुमचा फॉर्म मान्य केला जात नाही. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळत नाही.

  • लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरल्यानंतर पेडिंग, रिव्ह्युव्ह, डिसअप्रुव्ह असं दिसत असेल तर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्यास तक्रार कुठे करावी?

लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा न झाल्यास काळजी करण्याची काहीही गरज नाही. तक्रार करण्यासाठी तुम्ही १८१ या हेल्पलाइन नंबरवर फोन करुन तक्रार करु शकतात. तसेच नारी शक्ती दूत अॅपवरदेखील तक्रार करण्याचा पर्याय दिलेला आहे. त्यावरुन तुम्ही तक्रार करु शकतात. महिला अंगणवाडी केंद्रात जाऊनही तुम्ही तक्रार करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT