Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: कोणत्याही क्षणी खात्यात येणार पैसे,लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता का रखडला? कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana February Month Installment: लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे फेब्रुवारीचा हप्ता रखडल्याचे कारण आता समोर आले आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. जानेवारी महिन्यापर्यंत महिलांना पैसे मिळाले आहेत. परंतु आता फेब्रुवारी महिना संपत आला असूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे १५०० रुपये कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. (Ladki bahin yojana)

लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकांपूर्वी राबवण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा आहे. आज २६ तारीख आहे तरीही अजून पैसे खात्यात जमा न झाल्याने अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

लाडकी बहीण योजनेत पैसे लवकर येणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले होते. मी लाडकी बहीण योजनेच्या चेकवर सही करुन आलोय, असंही त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. परंतु तरीही अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, आता यामागचे कारण समोर आले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

याचसोबत लाडकी बहीण योजनेत पैसे न येण्यामागे अजून एक कारण असू शकतं. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच पैसे जमा होतील, असं सांगितलं आहे. त्यामुळे अजूनही पडताळणी पूर्ण झाली नसल्याचे दिसत आहे. यामुळे जेव्हा पडताळणी पूर्ण होईल त्यानंतरच पैसे दिले जातील. या योजनेत फेब्रुवारीचा हप्ता हा मार्च महिन्यातदेखील दिला जाऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती

Cancer : पायात दिसणारी '४ सामान्य लक्षणं असू शकतात कॅन्सरचा संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Pitru Paksha : पितृपक्षात दिसणारे 'हे' ५ संकेत मानले जातात शुभ, पितरांचा मिळतो आशीर्वाद अन् अडथळे होतात दूर

Pradip Purnekar Case: प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येमागं कुणाचा हात? ठाकरेंच्या नेत्याने थेट नाव सांगत केला धक्कादायक खुलासा

Mumbai Underworld: दाऊद इब्राहिम, छोटा राजन ते मन्या सुर्वे... मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचा लेखाजोखा वाचा

SCROLL FOR NEXT