Ladki Bahin Yojana SAAM TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का; कोणत्या कारणामुळे मिळणार नाही १५०० रूपये

Ladki Bahin Yojana Pune : नवीन सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठं विधान केलं होतं. बहिणींच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. अशात आता १०,००० महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याची बातमी समोर आली आहे.

Shreya Maskar

महाराष्ट्रात अनेक महिला 'लाडकी बहीण योजना'चा (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) लाभ घेत आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'माझी लाडकी बहीण योजना' राबवत आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी महिलेला दर महिना १५०० रुपये दिले जातात. लाडक्या बहिणी आता सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

सरकारने आता 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन लाडक्या बहिणींना केले आहे. मात्र अद्यापही या बाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. नवीन सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लाडकी बहीण' योजनेत अनेक बदल केले आहे. बहिणींच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पुणे जिल्ह्यात १५ ऑक्टोबरपर्यंत २१ लाखांहून अधिक 'लाडकी बहीण योजना'चा अर्ज दाखल करण्यात आले. आचारसंहितेच्या वेळी 'लाडकी बहीण' योजनेचे काम थांबले असल्यामुळे आता सरकार स्थापन झाल्यावर पुन्हा काम सुरू झाले आहे. आतापर्यंत पुण्यातील ९,८१४ अर्ज अपात्र ठरले आहेत तर ५,७२४ अर्ज छोट्या त्रुटींमुळे तात्पुरता नाकारण्यात आले असून एकूण अर्जदारांपैकी ६९,१७५ अर्जदारांची आधार संलग्नता तपासणी बाकी आहे.

आतापर्यंत पुणे जिल्ह्यात २० लाख ८४ हजार ३६४ महिलांना 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळाला आहे. पुण्यात अजूनही 12,000 अर्जाची छाननी होणे बाकी आहे.पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहि‍णींना अर्जाची स्थिती महिला बालकल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. पुण्यात हवेली तालुक्यातून सर्वाधिक अर्ज आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT