Ladki Bahin Yojana ₹3000 payment date Saam TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹३००० जमा होणार, तारीखही आली समोर, महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana ₹3000 payment date : लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. ३००० रुपये कधी जमा होणार आणि सरकारकडून काय अपडेट आहे, जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin July August installment Date Update : राज्यातील पात्र लाभार्थी महिल्यांच्या खात्यावर एकाचवेळी ३ हजार रूपये जमा होणार असल्याची माहिती सरकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. राज्यातील लाडक्या बहि‍णींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा हप्ता एकत्र हप्ता दिला जाऊ शकतो, असे महिला व बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सकाळसोबत बोलताना सांगितले.

२८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, त्या पार्श्वभूमिवर सरकारकडून राज्यातील महिलांना २ हप्ते एकत्र देण्यावर विचार झाल्याची माहिती मिळाली आहे. ऑगस्ट महिन्याचे २ आठवडे झाले आहेत. पण अद्याप जुलै महिन्याचाच हप्ता खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे ऑगस्ट आणि जुलै या दोन महिन्याचे हप्ते एकत्र येणार का? अशी चर्चाही लाडक्या बहि‍णींमध्ये सुरू होती. पण आता यावर सरकारी अधिकाऱ्याने अपडेट दिली आहे. पण अद्याप सरकारकडून अधिकृत याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात कागदपत्रांमध्ये शिथिलता देण्यात आली, राज्यभरात २ कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत होता. यामध्ये कुटुंबाचे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या आणि एकाच कुटुंबातील सासू, दोन सूना, मुलींनीही अर्ज केले होते. काही महिने नियमित लाभ मिळू लागला. पण फेब्रुवारी २०२५ पासून योजनेच्या निकषांनुसार सर्वच लाभार्थींची पडताळणी सुरू झाली आणि अशा महिलांचा लाभ बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार राज्यातील ८० लाखांपेक्षा जास्त महिलांचा लाभ बंद झाला आहे.

१५०० येणार की ३०० जमा होणार? संभ्रम कायम

राज्यातील पात्र एक कोटी ६६ लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ जमा होते. जुलै महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात लाभ वितरीत केला जातो. आता २० ऑगस्टपर्यंत खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे. पण एका महिन्याचा लाभ खात्यात जमा होणार की २ महिन्याचे ३ हजार रूपये एकत्र खात्यात येणार, याकडे लाडक्या बहि‍णींचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

पीएम किसान योजनेतून ४,००० नावे वगळली जाणार; शासनाकडून कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन, काय आहे कारण?

Kuttu Flour Puri Recipe : उपवासाची कुट्टूची पुरी बनवताना तुटते? पिठात मिसळा 'हा' पदार्थ, पुरी होईल कुरकुरीत अन् टम्म फुललेली

Chilled Water: थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या शरीरावर होणारे ७ परिणाम!

Gold Rate Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा सोनं 3,900 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT