Ladki Bahin Yojana  Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाखो लाडकींची नावे का वगळली? महत्वाचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana News : लाखो लाडकींची नावे योजनेच्या यादीतून वगळण्यात आली आहे. या लाभार्थ्यांची नावे का वगळण्यात आली, याचे कारणही समोर आलं आहे.

Vishal Gangurde

लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष अधिक कठोर

अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन पडताळणी

एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांनाच मिळणार योजनेचा लाभ

शासकीय कर्मचारी, चारचाकी वाहनधारक महिला आणि वयाच्या अटींचे पालन न करणाऱ्या महिला अपात्र ठरणार

राज्यात गेल्या वर्षभरापासून लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. दुसरीकडे योजनेतील काही अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहे. आता फक्त पात्र लाडक्या बहिणींना योजनेचे महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. या लोकप्रिय योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तर योजनेतील लाखो अपात्र महिलांचं नाव यादीतून वगळण्यात आलं आहे.

लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना शोध घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे. एकाच कुटुंबात दोनहून अधिक महिलांना लाभ घेता येणार नाही. त्यामुळे योजनेचा लाभ कोणी घ्यायचा यावरून कुटुंबामध्ये महाभारत रंगल्याचंही दिसत आहे.

'लाडकी'वरून घरात महाभारत

सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपयांवर पाणी कोण सोडणार, यावरून सासू-सून आणि जाऊबाईमध्ये वाद वाढल्याचंही पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध भागात गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पडताळणीचं काम सुरु झालंय. त्यानंतर राज्यातील लाखो अपात्र महिलांना लाभ मिळणे बंद झाले आहेत.

अपात्र ठरवण्याचे नियम काय?

एकाच कुटुंबातील दोनहून अधिक महिला लाभार्थी

एका कुटुंबातील दोन महिलांनाच या योजनेचा लाभ घेण्याची अनुमती आहे. परंतु २ पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

शासकीय कर्मचारी

योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती ही शासकीय/ निमशासकीय सेवेत कार्यरत आहेत. ती व्यक्ती अपात्र ठरणार आहे. सरकारची ही योजना फक्त अशासकीय किंवा गरजू लाभार्थ्यांसाठी आहे.

चारचाकी वाहन असणे

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिलेच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास, ती व्यक्ती अपात्र मानली जाते.

वयाची अट

योजनेच्या लाभार्थ्यांचं वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. परंतु वयाच्या अटीनुसार कमी किंवा जास्त वयाच्या व्यक्तींना लाभ दिला जात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sahibzada Farhan Gun Celebration: वाह दुबे जी वा! स्लोअर बॉलवर ढेर अन् म्हणे 'गन' सेलिब्रेशन|Video Viral

Bhadrapad Pola : बैलाची पूजा नव्हे, शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव; पुण्यात भाद्रपद पोळा उत्साहात साजरा, VIDEO

Maharashtra Live News Update: दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

Ind Vs Pak : आधी टेन्शन वाढवलं, नंतर टीम इंडियानं डाव सावरला, पाकिस्तानकडून भारताला इतक्या धावांचं आव्हान

Maharashtra Politics: मुंडेंना मंत्रिपदाची इच्छा? मी रिकामा बसलोय, जबाबदारी द्या' धनंजय मुंडेंनी मनातलं सांगितलं|VIDEO

SCROLL FOR NEXT