Ladaki Bahin Yojana  Agrowan
बिझनेस

Ladaki Bahin Yojana : बँकेत खातं नसेल तरी मिळणार लाडकी बहीण योजनेचा पैसा?

Ladaki Bahin Yojana : अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून सरकारने काही नियम शिथिल केले आहेत.

Bharat Jadhav

राज्य सरकारची महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ रक्षाबंधनाच्या दिवसापासून होणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील दीड कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे. त्यापूर्वी या योजनेसाठी काही नवीन नियम करण्यात आलेत. तर काही अटी व शर्तीमध्ये शिथिलता आणण्यात आल्या आहेत. यात ज्या महिलांचे बँकेत खाते नसेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

राज्य सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यभरातून योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी योजनेच्या नियमात शिथिलता आणण्यात आलीय. तांत्रिक अडचणी लक्षात घेता हे बदल करण्यात आलेत.

बँकेत नसेल तर पैसे मिळतील का?

ज्या महिलांचे बँकेत खाते नाही त्या महिलांना या योजनेचा लाभ कसा मिळेल का असा प्रश्न विचारला जातोय. ग्रामीण भागातील बँकेची सेवा नसते. त्यामुळे महिला बँकेत खाते उघडणे शक्य नसते. पण लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. परंतु योजनेच्या काही नियमात केलेल्या बदलामुळे आता ज्यांचे बँकेत खाते नाही त्या महिलांनाही पैसके मिळणार आहेत.

महिलांना पोस्टात खाते उघडणं आवश्यक आहे. या योजनेचा लाभ मिळावण्यासाठी पोस्टात खाते उघडावे लागेल. मिळालेल्या माहितीनुसार, 15 ते 19 ऑगस्टदरम्यान महिलाच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी हजारो महिलांनी अर्ज केले आहेत.

कोण आहे पात्र

योजनेसाठी अर्ज करणारी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.

राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळेल.

अर्जदार महिलेचं वय २१ ते ६५ वर्ष असावे.

लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे बँकेत किंवा पोस्टात खाते असणे आवश्यक आहे.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दुसऱ्याशी लग्न ठरल्याचा राग, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडवर चाकूने केले सपासप वार

LPG Rule: मोठी बातमी! १ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

पावसाच्या प्रत्येक थेंबाची अचूक नोंद होणार, पुण्यातील दाम्पत्यानं बनवलं 'पर्जन्यमापक यंत्र'

मानखुर्दमध्ये क्रेन कोसळली, मुंबईची वाहतूक 22 तास ठप्प

कामगारांच्या नोकरीवर टांगती तलवार? कामगारांवर आता कायद्यानं कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT