Kolhapuri chappal will now feature a QR code that reveals who made it and where it was crafted. saam Tv
बिझनेस

Kolhapuri Chappal: सहज ओळखता येणार अस्सल कोल्हापुरी; कोणी-कुठे बनवली चप्पल तेही कळणार

Kolhapuri Slipper With QR Code: आता प्रत्येक कोल्हापुरी चप्पलांच्या जोडीवर एक QR कोड असणार आहे. ते स्कॅन केल्यावर ग्राहकांना कोणत्या कारागिराने चप्पल बनवली आहे, कुठे तयार करण्यात आलीय त्याची माहिती होईल.

Bharat Jadhav

  • प्रत्येक कोल्हापुरी चप्पलवर QR कोड असणार, ग्राहकाला उत्पादनाची माहिती मिळणार

  • स्कॅन केल्यावर कारागीराची माहिती आणि बनवण्याचे ठिकाण उघड

  • प्रादा ब्रँडमुळे आधी चर्चेत आलेल्या कोल्हापुरी चप्पल पुन्हा चर्चेत

  • पारंपरिक वारशाला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न

भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपारिक चप्पलांपैकी एक असलेले कोल्हापुरी चप्पल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल 'प्रादा' नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने केल्यानंतर कोल्हापुरी चप्पल चर्चेत आली होता. आता परत क्युआर कोडमुळे ही चप्पल पुन्हा चर्चेचा विषय बनलीय. आता कोल्हापुरी चप्पल आता QR कोडसह बाजारात उपलब्ध होणार आहेत. (Kolhapuri chappals now feature scannable QR codes to trace artisan and origin)

कोल्हापुरी चप्पल सुंदर डिझाईन्स, हस्तकला आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखल्या जातात. या चप्पल प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तयार केल्या जातात. २०१९ मध्ये त्यांना जीआय टॅग देखील मिळाला आहे. यामुळे या चप्पल या प्रदेशाची ओळख आहे. त्यामुळे इतरत्र बनवलेल्या चप्पल खऱ्या मानल्या जाणार नाहीत.

आता प्रत्येक कोल्हापुरी चप्पल जोडीवर एक QR कोड असणार आहे. जे स्कॅन केल्यानंतर ग्राहकांना कोणत्या कारागिराने चप्पल बनवली आहे. ती कोणत्या जिल्ह्यात तयार केली गेली आहे, त्यात कोणते तंत्रज्ञान आणि कोणता कच्चा माल वापरला गेलाय याची सर्व माहिती यातून मिळणार आहे.

बनावट कोल्हापुरी चप्पलांची विक्री थांबवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारची संस्था असलेल्या लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रने क्युआर कोडचा निर्णय घेण्यात आलाय. खऱ्या कारागिरांना ओळख देणे, ग्राहकांचा विश्वास बळकट करणे. पारंपारिक कोल्हापुरी हस्तकलेची प्रतिष्ठा राखणे हा यामागील उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोल्हापुरी चप्पलचा इतिहास १२ व्या शतकापासूनचा आहे. स्थानिक कारागीर स्वावलंबी व्हावेत आणि स्वदेशी हस्तकलांना चालना मिळावी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी २० व्या शतकाच्या सुरुवातीला याचा प्रचार केला होता. ही नवीन QR कोड प्रणाली केवळ कोल्हापुरी चप्पलांना बनावट उत्पादनांपासून वाचवणार नाही तर कारागिरांना खरी ओळख देणार आहे.

आता कोल्हापुरी चप्पलमध्ये कोणता नवा बदल होतोय?

आता प्रत्येक कोल्हापुरी चप्पलच्या जोडीवर एक QR कोड असणार आहे.

या QR कोडमधून काय माहिती मिळणार आहे?

हा QR कोड स्कॅन केल्यावर ग्राहकाला त्या चप्पलचे कारागीर कोण आहेत, चप्पल कुठे तयार झाली आहे, याची माहिती मिळेल.

यामागचा उद्देश काय आहे?

ग्राहकांना पारंपरिक चप्पलांची खरी ओळख आणि कारागिरांचा सन्मान व्हावा, हा उद्देश आहे.

कोल्हापुरी चप्पल याआधी कशामुळे चर्चेत आली होती?

प्रादा नावाच्या इटालियन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल केल्यानंतर ही चप्पल चर्चेत आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Ujjawala Yojana: महिलांसाठी आनंदाची बातमी! उज्जवला योजनेत मोफत गॅस सिलिंडरसोबत मिळणार ₹१८३०

Hingoli Crime News: रात्रीच्या वेळी झोपेतून उठवून ऑफिसमध्ये नेलं अन्...; आश्रम शाळेत 11 वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य

पुतण्यासोबत संबंध, नंतर जत्रेला नेत नवऱ्याचा काटा काढला, ८ वर्षांच्या मुलाकडून आईचा खरा चेहरा समोर

Accident : हिट अँड रनचा थरार! भरधाव कारने बहिणींना चिरडले; थोरलीचा मृत्यू, धाकटी गंभीर जखमी

CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सिडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT