money  Saam Tv
बिझनेस

SIP Crorepati Route: फक्त ५ हजारांची महिना बचत करून कोट्यधीश व्हा, जाणून घ्या नेमकं गणित

Calculate How To Become Crorepati : तुम्ही फक्त ५ हजार रुपयांची महिना बचत करून कोट्यधीश होऊ शकता. यासाठी तुम्ही नेमकं गणित जाणून घ्या.

Vishal Gangurde

मुंबई : समाजातील बहुतेक व्यक्तींचं कोट्यधीश होण्याचं ध्येय असतं. महिन्याच्या खर्चातील बचत करून त्यांची श्रीमंत होण्याची इच्छा असते. या महागाईच्या काळात अनेक जण महिन्याच्या खर्चातील पैशांची बचत करून कोट्यधीश होण्याचं स्वप्न पाहत असतात. तुम्हाला स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी नेमकं गणित जाणून घ्यायला हवं.

खासगी क्षेत्रात नोकरी करूनही नोकरदार व्यक्ती कोट्यधीश होऊ शकतो. यासाठी नोकरदार व्यक्तीने बचतीची योजना गांभीर्याने घेतली पाहिजे. कारण वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करून सजग व्हायला हवं.

जाणून घ्या कोट्यधीश होण्याचं नेमकं गणित

तुम्हाला कोट्यधीश होण्यासाठी काही वर्षांनंतर किती कोटींची बचत करायची आहे, याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला दर महिना किती रुपयांची बचत करायची आहे, हे निश्चित ठरवलं पाहिजे. सध्याच्या काळात प्रत्येक जणांना म्युच्युअल फंडविषयी माहिती असते. तुम्ही दर महिन्याला ५०० रुपयांपासून म्युच्युअल फंडच्या SIPची सुरुवात करू शकता.

कोट्यधीश होण्यासाठी तुम्हाला महिन्याला ५००० रुपयांची SIP करावी लागेल. यावर तुम्हाला वार्षिक १५ टक्के परतावा मिळू शकतो. तुम्ही २२ वर्ष दर महिन्याला ५००० रुपयांची SIP केल्यानंतर सहज कोट्यधीश व्हाल. २२ वर्षांनंतर तुमच्याजवळ १.०३ कोटी रुपये जमा होईल. तुमचे २२ वर्षात एकूण १३.२० लाख रुपये जमा होईल. तुम्हाला वार्षिक परतावा १७ टक्के मिळाल्यास ५००० रुपयांची मासिक बचतीवर तुमच्या म्युच्युअल फंडात २० वर्षात १.०१ कोटी रुपये जमा होईल.

तुम्ही ५००० रुपयांची महिना SIP सुरु केल्यास त्यानंतर दर वर्षाला १० टक्क्यांनी वाढ करा. त्यावर तुम्हाला १२ टक्के परतावा मिळाला तरी २० वर्षांत तुमच्या फंडात १ कोटी रुपये जमा होईल. तुम्ही आजपासून ५००० रुपयांची SIP सुरु केल्यानंतर २०४४ सालापर्यंत १ कोटी रुपयांचे मालक व्हाल.

तुम्ही महिन्याला ५००० रुपयाची SIP सुरु केली. त्यानंतर या बचत फंडात दरवर्षी १० टक्क्यांनी वाढ होत असेल. त्याचबरोबर तुम्हाला वार्षिक १५ टक्के परतावा मिळत असेल तर तुमचे २० वर्षांत एकूण १,३९,१८,१५६ रुपये जमा होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT