Kisan Credit Card meta ai
बिझनेस

Kisan Credit Card : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! KCC मधून मिळणार तब्बल ₹5 लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

KCC Loan: किसान क्रेडिट कार्डच्या मगतीने पात्र शेतकऱ्यांना शेती, पशुपालन आणि मत्स्यपालनासाठी आर्थिक मदत मिळू शकते. केसीसी कर्ज मर्यादा ५ लाखांपर्यंत करण्याची घोषणा करण्यात आली असून व्याजदर व पात्रता बँकेनुसार बदलू शकते.

Sakshi Sunil Jadhav

शेतीचा वाढता खर्च, बियाणे, खतं, कृषी उपकरणं आणि इतर गरजा भागवण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी किसान क्रेडिड कार्ड (KCC) महत्त्वाची योजना आहे. केंद्र सरकारने बजेट २०२५-२६ मध्ये KCC अंतर्गत कर्जाची मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना आता आधीपेक्षा जास्त आर्थिक मदत मिळू शकते.

शेतीसोबत पशुपालन आणि मत्स्यपालनासाठीही कर्ज

KCC चा लाभ फक्त पीक उत्पादनापुरता मर्यादित नाही. पात्र शेतकरी पशुपालन आणि मत्स्यपालासारख्या संबंधित व्यवसायांसाठीही आर्थिक मदत घेऊ शकतात. बियाणे, खतं, कृषी निविष्ठा, यंत्रसामग्री, पीक साठवणूक आणि शेतीशी संबंधित इतर खर्चांसाठी या कर्जाचा वापर करता येतो.

KCC वर किती व्याज आकारलं जातं?

KCC चा व्याजदर हा बँक आणि लागू नियमांनुसार वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे कर्ज घेण्याआधी संबंधित बँकेकडून सध्याच्या व्याजदर, शुल्क आणि परतफेडीच्या अटी जाणून घेणं गरजेचं आहे. वेळेत कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना सरकारी व्याज सवलत योजनेंतर्गत अतिरिक्त लाभ मिळू शकतो.

कोणाला KCC मिळू शकते?

जमीनधारक पात्र शेतकऱ्यांसोबतच पात्रता अटी पूर्ण करणारे भाडेतत्वावर किंवा लीजवर शेती करणारे शेतकरी सुद्धा KCC साठी अर्ज करू शकतात. काही शेतकरी गट आणि स्वयं-सहायता गटातल्या पात्र सदस्यांनाही याचा लाभ मिळू शकतो.

अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

अर्ज करताना साधारणपणे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड आणि जमिनीशी संबंधित कागदपत्रे आवश्यक असू शकतात. पशुपालन किंवा मत्स्यपालनासाठी अर्ज असेल तर संबंधित जास्तीची कागदपत्रे मागितली जाऊ शकतात.

KCC साठी अर्ज कसा कराल?

शेतकरी सरकारी, ग्रामीण किंवा सहकारी बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकतात. काही बँका ऑनलाइन अर्जाची सुविधाही देतात. जन समर्थ पोर्टल किंवा संबंधित बँकेच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे अर्जाची सुविधा उपलब्ध असू शकते. कर्ज घेण्यापूर्वी व्याजदर, परतफेडीचा कालावधी, शुल्क आणि पात्रता यांची माहिती बँकेकडून आठवणीने तपासावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT