Smart TV Buying Tips Saam Tv
बिझनेस

Smart TV खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात, होईल फायदा

Smart TV Buying Tips: जर तुम्ही टीव्हीबद्दल गोंधळलेले असाल आणि कोणता स्मार्ट टीव्ही घ्यायचा हे ठरवू शकत नसाल, तर खाली दिलेल्या टिप्स वाचून तुम्हाला स्वतःसाठी चांगला टीव्ही खरेदी करण्यात मदत होईल.

साम टिव्ही ब्युरो

Smart TV Buying Tips:

आजच्या काळात आपल्या गरजेनुसार स्मार्ट टीव्ही खरेदी करणे ही काही मोठी गोष्ट नाही. बाजारात इतके पर्याय उपलब्ध आहेत की, आपल्याला जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. पण तरीही जर तुम्ही टीव्हीबद्दल गोंधळलेले असाल आणि कोणता स्मार्ट टीव्ही घ्यायचा हे ठरवू शकत नसाल, तर खाली दिलेल्या टिप्स वाचून तुम्हाला स्वतःसाठी चांगला टीव्ही खरेदी करण्यात मदत होईल.

स्क्रीनचा आकार

टीव्हीचा स्क्रीन आकार तुमच्या खोलीच्या आकारावर आणि टीव्ही पाहण्याच्या अंतरावर अवलंबून असतो. मोठ्या खोल्यांसाठी, 55 इंचांपेक्षा मोठी स्क्रीन आणि लहान खोल्यांसाठी 32 ते 50 इंच स्क्रीन योग्य मानली जाते. म्हणजेच आपल्याला या अंतरावरून टीव्ही पाहून बेस्ट व्हिव्ह मिळतो.

रिझोल्यूशन

हाय क्वालिटी मनोरंजन अनुभव मिळवण्यासाठी किमान 4K रिझोल्यूशन असलेला टीव्ही निवडा. 4K हाय पिक्सेल डेन्सिटी देतो, परिणामी पिक्चर आणि व्हिडिओ क्वालिटी चांगली होते.

पॅनेलचा टायप

LED, OLED किंवा क्वांटम डॉट - प्रत्येक पॅनेलचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. OLED ची क्वालिटी बेस्ट म्हणता येईल, पण ती महाग आहे. LED हा एक चांगला बजेट पर्याय आहे. तर क्वांटम डॉट ब्राईट कलर आणि हाय कॉन्ट्रास्ट देतो.

रिफ्रेश रेट

हाय रिफ्रेश रेट (120Hz किंवा त्यापेक्षा जास्त) मुळे स्मूद मोशन आणि एक चांगला गेमिंग अनुभव येतो. मुविंग किंवा हाय फ्रेम रेट कॉन्टेन्ट पाहताना हे लक्षात ठेवले पाहिजे.

स्मार्ट फीचर्स

बहुतेक नवीन टीव्ही ॲप्स, व्हॉइस असिस्टंट आणि स्ट्रीमिंग सेवा यासारख्या स्मार्ट फीचर्सला सपोर्ट करतात. तुमच्या आवडत्या स्ट्रीमिंग सेवा आणि प्री-इंस्टॉल केलेले ॲप्स, तसेच भविष्यात नवीन ॲप्स इंस्टॉल करण्यासाठी स्टोरेज असलेला टीव्ही निवडा.

कनेक्टिव्हिटी

टीव्ही खरेदी करताना, HDMI पोर्ट, यूएसबी पोर्ट आणि वायरलेस कनेक्टिव्हिटी जसे की वाय-फाय आणि ब्लूटूथ पर्याय तपासा आणि तुम्ही टीव्हीला वेगवेगळ्या डिव्हाइसेसशी कनेक्ट करू शकता हे देखील तपासा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Maharashtra News Live Update: राज ठाकरे एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

SCROLL FOR NEXT