Kanya Sumangala Yojana, meta ai
बिझनेस

Sarkari Yojana : मुलगी असेल तर सरकार देणार ₹25 हजारांची मदत; जाणून घ्या कन्या सुमंगला योजनेच्या अटी आणि अर्जाची प्रोसेस

Kanya Sumangala Yojana : मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेत पात्र मुलींना जन्मापासून उच्च शिक्षणापर्यंत सहा टप्प्यांत २५,००० आर्थिक मदत मिळते. पात्रता, कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रोसेस जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

तुमच्या घरात मुली असतील तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. सरकार मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत करत आहे. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत पात्र कुटुंबातल्या मुलीला जन्मापासून उच्च शिक्षणापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर एकूण २५,००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम एकाच वेळी न देता सहा टप्प्यांमध्ये थेट बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा केली जाते.

सहा टप्प्यांत मिळते आर्थिक मदत

योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपयांपर्यंत मदत मिळते. त्यानंतर एक वर्षापर्यंतची सर्व आवश्यक लसीकरणं पूर्ण झाल्यावर २००० रुपये मिळतात. मुलीचा पहिलीत प्रवेश झाल्यावर ३००० रुपये, सहावीत प्रवेश घेतल्यावर ३००० रुपये आणि नवनवीत प्रवेश घेतल्यावर ५००० रुपये दिले जातात. बारावीनंतर पदवी, कॉलेज किंवा किमान दोन वर्षांच्या डिप्लोमा अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यावर शेवटी ७००० रुपये मिळतात. अशा प्रकारे एकूण २५,००० रुपयांची आर्थिक मदत मिळते.

कोणाला मिळणार लाभ?

तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब उत्तर प्रदेशचे कायमस्वरुपी रहिवासी असणं आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख किंवा त्यापेक्षा कमी असायला हवं. सामान्य परिस्थितीत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींना योजनेचा लाभ मिळतो.

काही विशेष परिस्थितींमध्ये जास्त तरतुदी आहेत. दुसऱ्या प्रसुतीत जुळ्या मुलींचा जन्म झाला तर तिन्ही मुलींना लाभ मिळू शकतो. तसेच कायदेशीररीत्या दत्तक घेतलेल्या अनाथ मुलीचाही योजनेत समावेश होऊ शकतो.

अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

अर्ज करताना राशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, मुलीचे आधार कार्ड, पालकांचे आधार, बँक पासबुकची प्रिंट आणि मुलीचा फोटो आवश्यक असतो. दत्तक मुलगी असल्यास संबंधित कायदेशीर कागदपत्रंही द्यावी लागतात.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

अर्जदाराने महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन Citizen Service Portal वर नोंदणी करावी. आधार, मोबाइल क्रमांक आणि इतर माहिती भरून OTP पडताळणी पूर्ण केल्यानंतर लॉगिन करून मुलीची माहिती नोंदवावी. संबंधित टप्प्यानुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जाची प्रोसेस पूर्ण होते. पात्रता ठरल्यावर मंजूर रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईकरांची पाणी टंचाईची चिंता संपली! महत्त्वाच्या ७ धरणांमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा

Govinda: गोविंदा संतापला; कायदेशीर कारवाईचा कडक इशारा, अफवा पसरवणाऱ्यांना थेट १०० कोटींचा फटका

Bathroom Tips : बाथरूममधील पिवळे डाग कितीही घासले तरी जात नाहीत? हे घरगुती उपाय करतील मदत

NEET, TET नंतर महाराष्ट्रात आणखी एक पेपर फुटला, बहिणीसाठी शिक्षिकेनेच रचला कट

Maharashtra News Live Update: पुणे विमानतळ रस्त्यावर भीषण अपघात

SCROLL FOR NEXT