JIO VS AIRTEL ₹299 PREPAID PLAN WHO OFFERS MORE DATA, CALLS AND SMS? Saam tv
बिझनेस

Jio VS Airtel: ₹२९९ प्रीपेड प्लॅनमध्ये जास्त डेटा कोण देईल, जिओ की एअरटेल?

Prepaid Comparison: जर तुमच्याकडे एअरटेल आणि जिओ दोन्ही सिम असतील, तर आम्ही २९९ रुपयांच्या प्लॅन्सची तुलना करून सांगणार कोणत्या कंपनीकडे कमी डेटा मिळतो.

Dhanshri Shintre

जर तुमच्याकडे ड्युअल सिम फोन असेल ज्यात एअरटेल आणि रिलायन्स जिओ प्रीपेड सिम्स असतील, तर तुम्हाला कदाचित हा प्रश्न आला असेल की कोणता प्लॅन जास्त फायदेशीर आहे. दोन्ही कंपन्यांकडे प्रीपेड यूजर्ससाठी २९९ रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. पण मुख्य मुद्दा म्हणजे कोणती कंपनी या रिचार्जमध्ये जास्त डेटा देईल. आज आम्ही या तुलनेत तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करणार आहोत.

जिओ २९९ प्लॅनची ​​माहिती

रिलायन्स जिओच्या २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. ज्यामुळे इंटरनेट, कॉलिंग आणि मेसेजिंगचा संपूर्ण अनुभव मिळतो.

जिओ २९९ प्लॅनची ​​वैधता

रिलायन्स जिओचा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन २८ दिवसांसाठी वैध असून, दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. एकूण ४२ जीबी हाय-स्पीड डेटा, जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचे अतिरिक्त फायदे देखील मिळतात.

एअरटेल २९९ प्लॅनची ​​माहिती

एअरटेलच्या २९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. ज्यामुळे इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा सतत वापरण्यास सोपी होते.

एअरटेल २९९ प्लॅनची ​​वैधता

एअरटेलचा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन जिओसारखा २८ दिवसांसाठी वैध असून, दररोज १ जीबी डेटा देतो, एकूण २८ जीबी हाय-स्पीड डेटा उपलब्ध असून ग्राहकांना सतत इंटरनेटचा अनुभव मिळतो.

फरक

एअरटेल आणि जिओच्या २९९ रुपयांच्या प्लॅन्सची किंमत सारखी असली तरी, जिओ यूजर्सना ४२ जीबी डेटा मिळतो, तर एअरटेल फक्त २८ जीबी देतो, म्हणजे एअरटेल १४ जीबी कमी डेटा पुरवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप! बड्या नेत्यानं सोडली शरद पवार गटाची साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

SCROLL FOR NEXT