जिओच्या ११९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते.
या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा, म्हणजे एकूण २५२ जीबी मिळतो.
अमर्यादित कॉलिंग, १०० एसएमएस आणि मोफत हॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळते.
जिओच्या ५जी सेवेसह ग्राहकांना अमर्यादित इंटरनेटचा लाभ घेता येतो.
जिओ आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने आकर्षक प्लॅन्स बाजारात आणत आहे. त्यापैकी सर्वाधिक लोकप्रिय ठरू शकणारा प्लॅन म्हणजे ११९९ रुपयांचा. हा प्लॅन खासकरून हेवी डेटा वापरकर्त्यांसाठी उत्तम मानला जातो. कारण या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा दिला जातो. यामुळे एकूण ८४ दिवसांच्या कालावधीत यूजर्सना तब्बल २५२ जीबी डेटा मिळतो.
या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जाते. याशिवाय, यूजर्सना ९० दिवसांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन मोफत मिळते. कंपनीकडून ५० जीबी जिओ एआय क्लाउड स्टोरेजची सोयही केली गेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्लॅनमध्ये अमर्यादित ५जी डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या भागात जिओची ५जी सेवा सक्रिय आहे, तिथल्या ग्राहकांना अमर्यादित इंटरनेटचा लाभ घेता येतो.
कमी बजेटमधील ग्राहकांसाठी जिओकडून ४४९ रुपयांचा एक पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातही दररोज ३ जीबी डेटाची सुविधा दिली जाते. मात्र या प्लॅनची वैधता फक्त २८ दिवसांची आहे. तरीदेखील या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, मोफत जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह इतर अनेक सुविधा दिल्या गेल्या आहेत.
जिओचे हे दोन्ही प्लॅन्स डेटा यूजर्सच्या गरजेनुसार उत्तम ठरत आहेत. जास्त कालावधीसाठी भरपूर डेटा हवा असल्यास ११९९ रुपयांचा प्लॅन सर्वोत्तम आहे, तर कमी खर्चात कमी कालावधीसाठी डेटा हवा असल्यास ४४९ रुपयांचा प्लॅन ग्राहकांसाठी चांगला पर्याय ठरतो.
जिओच्या ११९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये किती डेटा मिळतो?
या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो, म्हणजेच एकूण २५२ जीबी डेटा मिळतो.
या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएस सुविधा आहेत का?
हो, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा आहे.
फ्री ओटीटी सबस्क्रिप्शनमध्ये काय मिळतं?
या प्लॅनमध्ये ९० दिवसांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन मोफत मिळतं.
जिओ ५जी इंटरनेटही मोफत मिळतं का?
हो, जर तुम्ही ज्या भागात राहत आहात तिथे जिओ ५जी सेवा उपलब्ध असेल, तर तुम्हाला अमर्यादित ५जी इंटरनेटचा लाभ घेता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.