Reliance Jio  ANI
बिझनेस

Jio Down : सिग्नल मिळेना, इंटरनेटही गेलं; जिओने उडवली ग्राहकांची झोप

Reliance Jio Down : जिओची सर्व्हिस डाऊन झाली आहे. अनेक युजर्सला याचा फटका बसला आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Jio Services Down : रिलायन्स जिओची सर्व्हिस अचानक कोलमडली आहे. काही युजर्सच्या मोबाइलमध्ये जिओचा सिग्नलच येत नाही. तर काहींच्या मोबाइलमधून इंटरनेट गायब झालेय. जिओची सेवा अचानक ठप्प झाल्यामुळे युजर्सचा मोठा फटका बसत आहे. अनेकांनी आपला राग सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. ट्वीटरवर (आताचे एक्स) आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर #jiodown हा हॅशटॅग सध्या ट्रेंड करत आहे.

20 टक्के लोकांनी Downdetector वर इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये व्यत्यय आल्याची तक्रार नोंदवली आहे. तर 14 टक्के लोकांना जिओ फायबर चालवताना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. रिलायन्स जिओची वेबसाइटही व्यवस्थित काम करत नाही. त्याशिवाय जिओचं अॅपही प्रभावित झालेय. एकूण काय तर जिओच्या वापरकर्त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दुपारी 12 वाजेपर्यंत डाउनडिटेक्टरवर 10 ते १५ हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. दिल्ली, लखनौ आणि मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये जिओ युजर्सला मोठा फटका बसला आहे. येथूनच सर्वाधिक आउटेजच्या समस्या अधिक नोंदल्या गेल्या आहेत.

Downdetector वर हजारोंच्या तक्रारी

मुंबई, पुण्यासह देशभरातील जिओ युजर्सला इंटरनेट आणि नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. देशभरातील युजर्स जिओची सेवा बंद असल्याच्या तक्रारी नोंदवत आहे. आतापर्यत Downdetector वर हजारो तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर #jiodown हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. काही नेटकऱ्यांनी जिओवरुन मीम्स शेअर केल्या आहेत. दरम्यान, जिओची सेवा प्रभावित झाल्यानंतर कंपनीकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जिओकडून या समस्येचा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT