Gold Price Today Saam Tv
बिझनेस

सुवर्णनगरीत सोन्या-चांदीचं दर बदलले! प्रति तोळा इतके झाले, चांदी थेट ३,००० रुपयांनी महागली; पाहा आजचे नवे दर

Gold Price Today : सोनं आणि चांदी दराच्या घसरणीनंतर सराफा बाजारात अचानक तेजी आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४३ हजारांच्या पार पोहोचला आहे. तर चांदी सव्वा दोन लाखांवर गेल्याचे पाहायला मिळाले.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. सुवर्णनगरी जळगावात आज सकाळी बाजार सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी दरवाढ पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात प्रति किलो ३ हजार रुपयांची मोठी वाढ झाली आहे. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये आणि व्यापारी वर्गात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारात सोन्या-चांदीचे दर घसरत असल्याने नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी होत होती. मात्र, आज सकाळी मार्केट सुरू होताच बाजाराने पुन्हा उसळी घेतली असून दोन्ही मौल्यवान धातूंचे दर कडाडले आहेत. लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही वाढ ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारी ठरू शकते. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक घडामोडी आणि बाजारपेठेतील मागणीमुळे ही दरवाढ झाली असण्याची शक्यता आहे.

जळगावमधील आजचे सोन्या-चांदीचे ताजे दर:

२२ कॅरेट सोने (22K Gold): ₹ १,३१,१७० प्रति १० ग्रॅम

२४ कॅरेट सोने (24K Gold): ₹ १,४३,२०० प्रति १० ग्रॅम

चांदी (Silver): ₹ २,२७,००० प्रति किलो

ग्राहकांमध्ये संभ्रम, खरेदीवर होणार परिणाम?

गेल्या काही दिवसांपासून बाजारात मंदीचे सावट असल्याने अनेक ग्राहक दर आणखी कमी होतील या आशेने वाट पाहत होते. मात्र, २ दिवसांपासून अचानक झालेल्या या मोठ्या दरवाढीमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडले असून बाजारात काहीसा संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या मते, अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा सोन्याकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे ही दरवाढ झाली आहे. आगामी काळात ही तेजी अशीच कायम राहणार की दरात पुन्हा घसरण होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: क्रांती येत आहे, आम्ही सत्ताबदलाच्या दिशेने जात आहोत - संजय राऊत

Chemical Free Facewash For Pimple And Dark Spots: पिंपल्स आणि काळ्या डागांवर सोपा घरगुती उपाय, घरच्या घरी बनवा केमिकल फ्रि फेसवॉश!

कानाला बंदूक,२ राऊंड फायर अन् २७ किलो सोनं गायब! जळगावात चित्रपटालाही शोभेल असा बँक दरोडा, असा उघड झाला कट

भाजपचा अजब कारभार! वर्षभरापूर्वी निधन झालेल्या नेत्याला कार्यकारिणीत स्थान; दिली मोठी जबाबदारी

SBI क्रेडिट कार्ड वापरताय? 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, पेट्रोल-डिझेल आणि प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार!

SCROLL FOR NEXT