ITR FILED BEFORE JULY 31? IMPORTANT CHECKS TO AVOID REFUND DELAYS AND TAX ISSUES Saam Tv
बिझनेस

ITR Update : तुम्हीसुद्धा ३१ जुलैपूर्वी ITR भरला? 'या' महत्त्वाच्या गोष्टी आताच तपासा नाहीतर...

ITR Update News : ३१ जुलैपूर्वी ITR भरला आहे का? ई-व्हेरिफिकेशन, AIS, TIS, Form 26AS, TDS, बँक खाते आणि रिफंडसंबंधी महत्त्वाच्या बाबी तपासून भविष्यातील अडचणी आणि रिफंडमध्ये होणारा विलंब टाळा.

Alisha Khedekar

  • ITR भरल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे का, याची खात्री करा.

  • AIS, TIS आणि Form 26AS मधील माहिती ITR शी जुळते का, ते तपासा

  • रिफंडसाठी बँक खाते योग्य आणि व्हॅलिडेटेड असल्याची खात्री करा

  • Form 16, TDS प्रमाणपत्र आणि इतर करसंबंधित कागदपत्रे सुरक्षित ठेवा

कर्मचाऱ्यांनो तुम्हीदेखील ३१ जुलैपूर्वी ITR भरला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. अनेकदा तारीख चुकू नये म्हणून कर्मचारी वेळेआधी ITR भरून घेतात. शक्यतो डेडलाईन चुकू नये हा यामागचा अट्टाहास असतो. मात्र, तुम्ही ITR आधीच भरला असला तरी ३१ जुलैपूर्वी काही महत्त्वाच्या बाबी पुन्हा एकदा तपासणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणी आणि रिफंडमध्ये होणारा विलंब टाळता येऊ शकतो.

सर्वप्रथम, तुमचा ITR ई-व्हेरिफाय झाला आहे का, हे तपासा. फक्त रिटर्न भरल्याने प्रक्रिया पूर्ण होत नाही. ई-व्हेरिफिकेशन न झाल्यास रिटर्न बेकायदेशीर मानला जाऊ शकतो. त्यामुळे ITR चा स्टेटस "Successfully e-Verified" असा दिसत असल्याची खात्री करा. याशिवाय AIS (Annual Information Statement), TIS (Taxpayer Information Summary) आणि Form 26AS पुन्हा तपासणे गरजेचे आहे. यात नमूद केलेली उत्पन्नाची माहिती, TDS आणि इतर तपशील तुमच्या ITR शी जुळतात का, हे पाहावे.

अनेकदा बँका, नियोक्ता किंवा इतर संस्थांकडून नंतरही माहिती अपडेट केली जाते. त्यामुळे अतिरिक्त TDS क्रेडिट मिळाले आहे का, हे तपासणे महत्त्वाचे ठरते. तसेच, तुमच्या रिटर्नमध्ये उत्पन्नाचे सर्व स्रोत, डिडक्शन, डिस्काउंट, भांडवली नफा, परदेशातील मालमत्तेची माहिती आणि कॅरी फॉरवर्ड तोट्याचा योग्य उल्लेख झाला आहे का, याची खात्री करा.

जर तुम्हाला रिफंड मिळणार असेल, तर बँक खात्याची माहिती अचूक आणि व्हॅलिडिटेड असल्याचे तपासा. चुकीची बँक माहिती असल्यास रिफंड उशिरा मिळू शकतो. याशिवाय फॉर्म 16, TDS प्रमाणपत्र, गुंतवणुकीचे पुरावे, बँक स्टेटमेंट आणि इतर आवश्यक कागदपत्रे सुरक्षित ठेवावीत. तसेच आयकर विभागाकडून येणारे नोटिफिकेशन, ई-मेल किंवा संदेश नियमितपणे तपासत राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आजच WhatsApp मधील या 10 महत्त्वाच्या सेटिंग्स बदला, स्कॅमर्सचा प्रत्येक डाव ठरेल फोल

Maharashtra Politics: माजी खासदारांना शिवीगाळ, भाजप नेत्याचा तडकाफडकी पदाचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Plastic Currency : तुमच्या खिशातील कागदी नोटा बंद होणार? आरबीआय आणतेय प्लॅस्टिकच्या नोटा; जुन्या नोटांचे काय होणार?

Maharashtra News Live Update: दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद

Pune : तपासाच्या नावाखाली पर्यटन! पुण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्यासह तिघांवर कारवाई, दोन वर्षांची वेतनवाढ थांबवली

SCROLL FOR NEXT