ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling: उशिरा आयटीआर फाइल केल्यास किती दंड भरावा लागतो? वाचा सविस्तर

ITR Filling Fine: आयटीआर भरण्यास सुरुवात झाली आहे. परंतु अनेकदा करदाते मुदतीनंतर आयटीआर फाइल करतात. मुदतीनंतर आयटीआर फाइल केल्यावर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन यावर्षी वाढवून देण्यात आला आहे. आता तुम्ही १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आयटीआर फाइल करु शकतात. आयटीआर फाइल करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. आयटीआर फाइल करायला उशिर करु नका. जर तुम्ही उशिरा आयटीआर फाइल केला तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुम्हाला दंडासोबतच व्याजदेखील द्यावे लागेल.

आयटीआर फाइल (ITR File) करण्याची प्रोसेस १ एप्रिल रोजी सुरु होते. मात्र, यावर्षी ही प्रोसेस उशिरा सुरु झाली आहे. आयटीआरचे सर्व फॉर्म सुरु करण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार योग्य फॉर्म भरायचा आहे.

आयटीआर उशिरा भरल्यास दंड किती? (If We File ITR After Deadline fine)

जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तुम्हाला तुमच्ये अनपेड टॅक्सवर दर महिन्याला १ टक्के व्याज भरावाल लागणार आहे. याचसोबत दंडाची फी वेगळी असणार आहे.

आयकर कलम 234F अंतर्गत जर तुम्ही आयटीआर फाइल करण्यास उशिर केला तर ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यावर ५००० रुपये आणि ५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असल्यावर १००० रुपये दंड भरावा लागणार आहे.

बिलेटेड आयटीआर (Belated ITR)

जर तुम्हाला आयटीआर भरण्यास उशिर झाल्यास तुम्हाला बिलेटेड आयटीआर फाइल करता येणार आहे. परंतु त्याआधी तुम्हाला दंड भरावा लागतो. सामान्यतः बिलेटेड आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ असते. तोपर्यंत तुम्ही आयटीआर फाइल करु शकतात परंतु यावर तुम्हाला उत्पन्नानुसार दंड भरावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 तास ठाण्यातच ठेवले; 73 वर्षीय नागरिकाला ठाण्यातच ब्रेन स्ट्रोक, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये दाखल

Skin Care : शरीरावरील स्ट्रेच मार्क 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत, वेळीच घ्या जाणून

Nepal : ६ हून अधिक शहरांमध्ये कर्फ्यू; नेपाळमध्ये हिंसाचार उफाळला, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना

LPG सिलेंडर ते रेल्वे तिकीट; १ ऑगस्टपासून देशभरात होतील ५ मोठे बदल

SCROLL FOR NEXT