Fact Check Saam Tv
बिझनेस

Fact Check: केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला देणार ३,५०० रुपये? नेमकं सत्य काय?

Fact Check News: सध्या एका युट्यूब चॅनलवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला ३५०० रुपये देणार असल्याचे सांगण्यात आले आहेत.

Siddhi Hande

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.यात यूट्यूब चॅनलवर तर विविध विषयांवर व्हिडिओ तयार केले जातात. यात सरकारी योजना, शिक्षणाबद्दलची माहिती लोकापर्यंत पोहचवली जाते. मात्र, सध्या युट्यूब चॅनलवरुन खोटी माहिती पसरवण्याचेही काम केले जात आहे. सध्या असाच एक युट्यूब व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात केंद्र सरकार गरीब कुटुंबाला दर महिन्याला ३५०० रुपये दिले जाणार आहे, असा दावा केला जात आहे.

या युट्यूब चॅनेलवरुन तुम्हाला दर महिन्याला पैसे त्याचसोबत ५० किलो धान्य मोफत देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु हा दावा खोटा आहे. अशी कोणत्याही प्रकारची योजना किंवा माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तीला सरकारकडून पैसे दिले जाणार आहे. त्याचसोबत १० टक्के गॅरंटी लागू होणार आहे. मात्र, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. केंद्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

या व्हिडिओबाबत पीआयबीने फॅक्ट चेक केले आहे. त्यानुसार, सरकारकडून अशी कोणतीही योजना किंवा माहिती देण्यात आलेली नाही. असा कोणत्याही प्रकारचा मजकूर शेअर करु नका, असंही पीआयबीद्वारे सांगण्यात आले आहे. अशा अनेक युट्यूब चॅनलवरुन खोटी माहिती शेअर केली जात आहे.त्यामुळे अशा कोणत्याबी लिंकवर क्लिक करु नका, असं सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावर नेहमी असे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओद्वारे खोटी माहिती पसरवली जाते. सरकारी योजनांच्या नावाखाली अनेक लोकांची फसवणूक केली जाते. अनेकदा सरकारच्या या योजनेतून पैसे मिळणार त्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल, पैसे भरावे लागतील असं सांगून पैसे आणि तुमची माहिती मिळवली जाते. तुमची माहितीचा अनेक लोक गैरवापर करु शकतात. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

SCROLL FOR NEXT