Success Story Saam T
बिझनेस

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, लंडनमधील लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS आशिष तिवारी यांचा प्रवास

Success Story of IPS Ashish Tiwari: आयपीएस आशिष तिवारी यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी लंडनमधील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडली.

Siddhi Hande

IPS आशिष तिवारी यांचा प्रेरणादायी प्रवास

लंडन-जपानमधील नोकरी सोडली अन् भारतात परतले

पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक

अनेकांचे आयएएस, आयपीएस होण्याचे स्वप्न असते. यासाठी यूपीएससी परीक्षा द्यावी लागते. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. अनेकदा आपल्याला एखाद्या ठिकाणी चांगली नोकरीदेखील मिळते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसरा मार्गदेखील असतो. परंतु तरीही मनात आयएसस, आयपीएस होण्याची इच्छा असते. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. असंच काहीसं आशिष तिवारी यांच्यासोबत झालं. त्यांनी लंडनमधील नोकरी सोडून यूपीएससी परीक्षा दिली.

आशिष तिवारी यांचे शिक्षण (IPS Ashish Tiwari Education)

आशिष तिवारी यांचा जन्म २६ ऑगस्ट १९८३ मध्ये मध्य प्रदेशमधील होशांगाबाद गावी झाला. ते मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील रेल्वेत इंजिनियर होते. आशिष यांनी आपले शालेय शिक्षण होशांगाबाद येथील केंद्रीय विद्यालयातून पूर्ण केले. ते सुरुवातीपासूनच हुशार होते. त्यानंतर त्यांनी आयआयटी कानपूरमध्ये अॅडमिशन घेतले. त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक आणि एकटेक केले.

लंडन-जपानमधील नोकरी सोडली

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आशिष यांना लंडनमधील एका प्रसिद्ध कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांना जपानमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. परदेशात नोकरी करण्याची संधी मिळूनदेखील आशिष यांचे मन लागत नव्हते. ते २०१० मध्ये भारतात परतले आणि त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांना ३३० रँक मिळाली. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. यावेळी २०१२ मध्ये त्यांनी २१९ रँक प्राप्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Ticket Discount News: प्रवाशांसाठी गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर मिळणार ३ टक्के सूट; वाचा काय आहे 'ही'योजना?

Maharashtra Live News Update: आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे कारागृहातून लढवणार निवडणूक

Bollywood Movies 2026: 'बॅटल ऑफ गलवान' ते 'धुरंधर २'; २०२६मध्ये प्रदर्शित होणार बॉलिवूडचे हे मोठे चित्रपट

Kasba Ganpati : भाविकांसाठी आनंदवार्ता! पुण्यातील प्रसिद्ध मंदिर दर्शनासाठी खुले; वाचा सविस्तर

BMC Election 2026: अखेरच्या क्षणी वंचितकडून काँग्रेसला दणका, १६ वॉर्डमध्ये उमेदवारच नाही; इच्छुकांचा संताप

SCROLL FOR NEXT