IPS Anjana Krishna Saam Tv
बिझनेस

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

IPS Anjana Krishna UPSC Success Story: यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. अशीच मेहनत आयपीएस अंजना कृष्णा यांनी केली. त्यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

आयपीएस अंजना कृष्णा चर्चेत

कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा?

आयपीएस अंजना कृष्णा यांचा आयपीएस अधिकारी होण्याचा प्रवास

आयपीएस अंजना कृष्णा या सध्या चर्चेत आल्या आहेत. आयपीएस अंजना कृष्णा यांचा अजित पवारांशी बोलतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यामध्ये अजित पवारांनी आयपीएस अंजना यांना तंबी दिली होती. आयपीएस अंजना या सोलापूरमधील करमाळा येथे डीएसपी पदावर कार्यरत आहेत. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्या गेल्या २ वर्षांपासून महाराष्ट्रात कार्यरत आहेत. (Solapur DSP Anjana Krishna)

अंजना कृष्णा यांचा प्रवास (IPS Anjana Krishna Success Story)

अंजना कृष्णा या मूळच्या केरळमधील तिरुवनंतपुरम येथील रहिवासी. त्यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांची आई कोर्टात टायपिस्ट म्हणून कार्यरत आहेत तर वडिलांची कपड्यांचा व्यवसाय आहे. अंजना यांचे प्रशासकीय सेवेत काम करायचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली.अंजना यांनी तिरुवनंतपुरम येथील सेंट मेरी सेंट्रल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी गणित वियात बीएस्सी पूर्ण केले. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अंजना यांनी मोठी स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

यूपीएससी परीक्षेची तयारी

अंजना यांनी बारावीत असतानाच यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी खूप मेहनत गेतली. त्यांना अनेकदा अपयशदेखील आले परंतु त्यांनी हार मानली नाही. २०२३ मध्ये त्यांना ३५५ रँक प्राप्त केली.s

कोरोना काळात संघर्षमय

कोरोना काळात अंजना या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्या काळात त्यांना त्यांच्या शिक्षकांनी खूप काही शिकवले. यानंतर त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षेची तयारी केली. या काळात त्यांना घरी लग्नाबद्दल सतत विचारणा सुरु होती. मुलीने लग्न करावे, अशी त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती. परंतु त्यांनी यूपीएससी परीक्षा पास करण्याचा ठाम निर्धार केला होता. त्यांनी २०२३ मध्ये यूपीएससी पास करुन शेवटी आपले स्वप्न पूर्ण केले.

अंजना कृष्णा या सोलापूरमध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना एक निर्भीड पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्या नेहमीच समाजासाठी काम करत असतात. त्यांचा हा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

SCROLL FOR NEXT